Cricketer Dance on Lollypop Lagelu Song, Video : नुकताच नेपाळ प्रीमियर लीगचा पहिला हंगाम नेपाळमध्ये खेळला गेला. जनकपूर बोल्ट या लीगचा पहिला चॅम्पियन ठरला. अंतिम सामन्यात जनकपूर बोल्ट्सने सुदूर पश्चिम रॉयल्सचा पराभव केला. जनकपूर बोल्टच्या एका खेळाडूसाठी हे जेतेपद खूप खास होते. त्याने प्रथमच एखाद्या टी२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या खेळाडूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा जेम्स नीशम (James Neesham) या विजयाचा आनंद साजरा करताना भोजपुरी गाणं लॉलीपॉप लागेलु वर डान्स करताना दिसला.
भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स
जनकपूरचा बोल्ट खेळाडू जेम्स नीशमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनकपूर बोल्टच्या विजयानंतरच्या एका पार्टीचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये जेम्स नीशम प्रसिद्ध भोजपुरी गाणे 'लॉलीपॉप लागेलु'वर जबरदस्त डान्स करत आहे. याशिवाय जेम्स नीशम नेपाळचा ध्वजही फडकवत आहे. जेम्स नीशमच्या डान्सचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतो आहे. याशिवाय जेम्स नीशमनेही या लीगनंतर सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आणि 'धन्यवाद नेपाळ.' असे कॅप्शन लिहीले आहे.
नीशमसाठी हा विजय इतका खास का?
न्यूझीलंडचा क्रिकेटर जेम्स नीशमने आतापर्यंत १८ वेगवेगळ्या संघांसाठी टी२० क्रिकेट खेळले आहे. याआधी त्याला कोणत्याही संघासोबत खेळताना जेतेपद पटकावता आले नव्हते. पण यावेळी त्याला ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट रॉयल्सने २० षटकात ९ गडी गमावून १८४ धावा केल्या. जनकपूर बोल्ट्सने हे लक्ष्य केवळ १९.२ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. लाहिरू मिलंथा याने ८७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.