Join us

VIDEO- सुरेश रैनाचं मुलीसाठी खास गाणं, 'बिटिया रानी' सोशल मीडियावर व्हायरल

टीम इंडियाचा प्लेअर सुरेश रैनाने मुलींना समर्पित करणारं गाणं गायलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 09:52 IST

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा प्लेअर सुरेश रैनाने मुलींना समर्पित करणारं गाणं गायलं आहे. रैनाने गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तसंच सोशल मीडियावरील अनेक युजर्ससह हरभजन सिंग, गौतम गंभीरपासून अनेकांनी त्याच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.सुरेश रैनाने पत्नी प्रियंकाच्या 'द प्रियंका रैना शो'साठी 'बिटिया रानी' हे गाणं गायलं आहे.

सुरेश रैनाच्या आवाजातील हे गाणं सगळ्यांनाच थक्क करणारं आहे. 'सुरेश रैनाने आपल्या शानदार आवाजात सुंदर गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द खूप छान आहेत' असं हरभजन सिंहने म्हटलं आहे. 'महिला आपलं कुटुंब, समाज आणि देशाचा आधारस्तंभ आहेत. पाठिंबा देण्यासाठी 'प्रियंका रैना शो ऐका', असं आवाहन इरफान पठाणने केलं आहे.

 

 

2015 मध्ये सुरेश रैनाने प्रियंकासोबत लग्नगाठ बांधली होती. 2016 मध्ये त्यांची मुलगी ग्रेशियाचा जन्म झाला. सुरेश रैना सध्या टीम इंडियामध्ये खेळताना दिसत नाही. पण क्रिकेटच्या मैदानाबाहेर सोशल मीडियावर तो झळकताना दिसत आहे.

टॅग्स :सुरेश रैनासोशल मीडियाक्रिकेट