Join us

सौरव गांगुलीचा बॉलिवूड गाण्यावर धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

सध्या सौरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणे हा त्याचा क्रिकेट खेळतानाचा नाहीतर चक्क डान्स करतानाचा व्हिडीओ आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 10:46 IST

Open in App

मुंबई : सौरव गांगुली हा टीम इंडियाच्या सर्वात चांगल्या कर्णधारांपैकी एक मानला जातो. सध्या सौरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा त्याचा क्रिकेट खेळतानाचा नाहीतर चक्क डान्स करतानाचा व्हिडीओ आहे. 

सौरव गांगुलीचा हा डान्स व्हिडीओ एका नाइट क्लबमधील आहे. यात सौरव क्लबमध्ये आणखीही काही लोकांसोबत डान्स करताना दिसत आहे. सौरवचा असा हा दिलखुलास अंदाज पहिल्यांदाज समोर आला आहे. 

नेहमीच सिरीअस आणि क्रिकेटबाबत गंभीर दिसणारा गांगुली यावेळी बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण काहीही संकोच न करता सौरव तू मेरा हिरो या गाण्यावर डान्स करताना दिसलाय.

टॅग्स :सौरभ गांगुलीक्रिकेट