Join us  

Video : पाकिस्तानची रणनीती वापरून विराट मिळवतोय विजय; शोएब अख्तरचं भारी 'लॉजिक'

भारतीय संघ सध्या भलत्याच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं एक डाव व 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:00 AM

Open in App

भारतीय संघ सध्या भलत्याच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं एक डाव व 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार  आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सुरू असलेली वाटचाल पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर खूपच खुश झाला आहे. पण, पाकिस्तान संघाच्या रणनीतीचा वापर करून कोहली यशस्वी होत असल्याचा दावा अख्तरने केला आहे. 

कोहलीनं पुणे कसोटीत 254 धावांची खेळी केली, तर मयांक अग्रवालनेही 108 धावांची खेळी करताना संघाला 601 धावांचा पल्ला गाठून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव गुंडाळला. आफ्रिकेला पहिल्या डावात 275, तर दुसऱ्या डावात 189 धावाच करता आल्या. 

आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

कोहलीच्या या विक्रमी कामगिरीवर अख्तर म्हणाला,''पूर्वी पाकिस्तानी संघाची विजयीची जी मानसिकता होती, ती आता विराट कोहली अवलंबतोय. त्यावेळी आम्ही संघात खेळीमेळीचं वातावरण राखायचो आणि विजयासाठी रणनीती आखायचो. 90च्या दशकात आम्ही भारताला त्यांच्याच घरी नमवले आहे, ते याच रणनीतीमुळे. कोहली आता तिच रणनीती वापरतोय. आता भारतीय संघाचे पूर्वीच्या पाकिस्तान संघात तर पाकिस्तान संघाचे पूर्वीच्या भारतीय संघात रुपांतर झाले आहेत. आम्हाला कोहली सारखा धाडसी क्रिकेटपटू हवाय.''

पाहा व्हिडीओ...

पत्रकारानं चार चौघांत काढले पाकिस्तान कर्णधाराचे वाभाडे...आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या धक्क्यातून अजूनही पाकिस्तानी चाहते सावरलेले नाही. त्यात श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर ट्वेंटी मालिकेत पाकला 0-3 असा दारूण पराभव पत्करावा लागला. त्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तान संघावर चाहते चिडले आहेत आणि तो राग एका पत्रकार परिषदेत निघालेला पाहायला मिळाला. पाकिस्तानी ट्वेंटी-20 चषक स्पर्धेच्या घोषणेच्यावेळी एका पत्रकारानं चार चौघांत पाकचा कर्णधार सर्फराज अहमदचे वाभाडे काढले. तो म्हणाला,''तू क्रिकेट चाहत्यांना निराश केले आहेस. त्यामुळे तुझा खेळ पाहण्यासाठी फैसलाबादला कोण येणार?'' 

टॅग्स :विराट कोहलीशोएब अख्तरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकापाकिस्तान