India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा व अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:35 AM2019-10-16T10:35:17+5:302019-10-16T10:35:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 3rd Test : South Africa team reached Ranchi for 3rd Test, but only five member's of team India touch ranchi | India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा व अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत आफ्रिकेवर उरलेली इभ्रत वाचवण्याचे आव्हान असणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी आफ्रिकेचा संघ बुधवारी रांचीत दाखल झाला, तर भारताचे केवळ पाचच खेळाडूंचं येथे आगमन झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ रांचीत दाखल झाला असताना भारताचे मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे पाच खेळाडू येथे दाखल झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडू येत्या एक-दोन दिवसांत रांचीत दाखल होतील, अशी माहिती आहे.

दुसरा कसोटी सामना 13 ऑक्टोबरल संपला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीपर्यंत खेळाडूंकडे सहा दिवसांचा कालावधी होता. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आमि मोहम्मद शमी यांच्यासह अन्य खेळाडू आपापल्या घरी गेले. हे खेळाडू गुरुवारी किंवा शुक्रवारी रांचीत दाखल होतील. कोहली, रहाणे व  रोहित हे तिघेही पुण्यातून थेट मुंबईत दाखल झाले होते. 

दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार
आफ्रिकेची चिंता वाढवणारी बातमी सामन्यानंतर धडकली आहे. त्यांच्या मुख्य खेळाडूनं तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजनं खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराजची माघार ही आफ्रिकेसाठी मोठा धक्काच आहे. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना महाराजला दुखापत झाली. महाराजनं गोलंदाजीत फार योगदान दिले नसले तरी फलंदाजीत त्यानं दुसरी कसोटी गाजवली. त्यानं पहिल्या डावात 132 चेंडूंत 72 धावा केल्या. याखेळीसह त्यानं वेर्नोन फिलेंडरसह ( 44) नवव्या विकेटसाठी 109 धावांची विक्रमी भागीदारीही केली.  दुसऱ्या डावातही महाराजनं 65 चेंडूंत 22 धावा केल्या आणि पुन्हा फिलेंडरसह 56 धावा जोडल्या. गोलंदाजीत त्यानं 50 षटकांत 196 धावा देत केवळ एक विकेट घेतली. 


''MRI रिपोर्टनुसार महाराजच्या डाव्या खांद्याचे स्नायू दुखावले गेले आहेत आणि त्यामुळे त्याला फलंदाजी करताना त्रास होत होता. गोलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला 14 ते 21 दिवसांच्या विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल,''अशी माहिती दक्षिण आफ्रिका संघाचे डॉक्टर रामजी हशेंद्र यांनी दिली. 
 

Web Title: India vs South Africa, 3rd Test : South Africa team reached Ranchi for 3rd Test, but only five member's of team India touch ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.