Join us

Video: संजय बांगरच्या मुलाने मुलगी बनल्यानंतर पहिल्यांदाच केला अफलातून डान्स, तुम्ही पाहिलात?

Sanjay Bangar Anaya Bangar, Dance Video: तिने मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच केलेल्या डान्स मुव्ह्जची चर्चा रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:17 IST

Open in App

Sanjay Bangar Anaya Bangar, Dance Video: भारतीय माजी क्रिकेटपटू आणि समलोचक संजय बांगर सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. मात्र त्याचे नाव सध्या एका वेगळ्या कारणास्तवही चर्चेत आहे. ते कारण म्हणजे त्याचा मुलगा आर्यन बांगर ( Aryan Bangar ) हा काही महिन्यांपूर्वी लंडनमधये लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झाला. आता ती अनया बांगर या नावाने ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच अनया भारतात आली. मुंबईत परतल्यावर तिने हेअरस्टाइल आणि लूकदेखील बदलला. ती खूपच ग्लॅमरस दिसते असे तिचे चाहते सोशल मीडियावर म्हणतात दिसतात. याचदरम्यान, आता तिने मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच केलेल्या भन्नाट डान्सची चर्चा रंगली आहे.

अनयाचा भन्नाट डान्स

संजय बांगरचा मुलगा जी आता मुलगी झाली आहे तिने पहिल्यांदाच जगासमोर आपले नृत्यकौशल्य सादर केले. अनया बांगरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत नाचताना दिसत आहे. तिची मैत्रीण नृत्याचे नेतृत्व करताना दिसते. तर अनया तिच्या मैत्रिणीच्या मागे डान्स करतेय. अनया ही मुलगी होण्याआधी आर्यन बांगर होता. तो संजय बांगरचा मुलगा असल्याने त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. पण आता मात्र मुलगी झाल्यावर तिला डान्समध्येही रूची असल्याचे दिसते आहे. तिच्या ज्या मैत्रिणीने व्हिडीओ पोस्ट केला आहे, तिने त्यात असेही लिहीले आहे की, अनयाला क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त आणखीही कला येतात. पाहा व्हिडीओ-

---

अनयाने इंस्टाग्रामद्वारे संपूर्ण जगाला तिच्या डान्स मूव्ह्ज दाखवल्या आहेत. जर तुम्ही त्या डान्स मूव्हज पाहिल्या तर तुम्ही म्हणाल की ती बॉलिवूडच्या तमन्ना, कतरिना किंवा मलायका यांसारख्या दिलखेचक नृत्यांगनांच्या तोडीचे नृत्य करते.

लिंगबदल प्रक्रियेचा प्रवास कठीण होता...

अनया बांगर इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच, तिने सोशल मीडियावर तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिची हार्मोनल रिप्लेसमेंट सर्जरी झाली असून ती सर्वार्थाने मुलीसारखी होत असल्याचे तिने सांगितले आहे.

टॅग्स :ट्रान्सजेंडरऑफ द फिल्डव्हायरल व्हिडिओसोशल व्हायरलसोशल मीडिया