Join us

Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीच्या रियूनीयननंतर दोघेही युवा पिढीला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 13:54 IST

Open in App

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीच्या रियूनीयननंतर दोघेही युवा पिढीला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यात दोघंही एकमेकांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देत आहेत. काही दिवसांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं शाळेतील मित्र कांबळीला एक चॅलेंज दिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याला आठवड्याची मुदतही दिली होती. कांबळीनं हे चॅलेंज पूर्ण केले आणि सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून तेंडुलकरला प्रश्नही विचारला आहे.

हे चॅलेंज जर त्याने आठवड्याभरात पूर्ण केले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार झाला होता आणि तेंडुलकरला आता त्याचा शब्द पाळावा लागणार आहे. तेंडुलकर आणि गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणं तयार केलं होतं. हे गाणं तेंडुलकरच्या कारकिर्दीवर आधारीत होतं. या गाण्यामध्ये तेंडुलकर कोणाकोणाबरोबर क्रिकेट खेळला आहे, हे दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर तेंडुलकरने कोणते फटके मारले आणि त्याला स्टेडियममध्ये कसा प्रतिसाद मिळायचा हे दाखवण्यात आले आहे.

हे गाणं सोनूबरोबर तेंडुलकरनेही गायले आहे. या गाण्यामध्ये या दोघांनी रंगत भरली आहे. तेंडुलकरने हे पार्श्वगायनामध्ये पदार्पण असेल.  तेंडुलकर आणि सोनू यांनी 'क्रिकेटवाली बीट पे' हे गाणं गायलं होतं. या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता हे गाणं गायचं चॅलेंज तेंडुलकरने कांबळीला दिले होते. यासाठी त्यानं कांबळीला आठवड्याभराची मुदत दिली आहे. या आठवड्याभरात जर कांबळीने हे गाणे व्यवस्थित गायले तर त्याला वाट्टेल ते द्यायला तेंडुलकर तयार होता. आता कांबळीनं हे आव्हान पूर्ण केल्यानंतर तेंडुलकरच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!

विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान

प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

टॅग्स :सचिन तेंडुलकरविनोद कांबळी