Join us  

रोहित शर्मा, इशान किशन आले अन् जहीर खानला खेचून घेऊन गेले; सोशल मीडियावर रंगली चर्चा

सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफ यांनी पूर्ण वानखेडे स्टेडियमवर फेरफटका मारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:04 PM

Open in App

बलाढ्य मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर बाजी मारताना कोलकाता नाइट रायडर्सला ५ गड्यांनी नमवले. यासह मुंबई इंडियन्सने यंदाचा सलग दुसरा विजय मिळवताना एकूण गुण मिळवले, कोलकाताला २० षटकांत ६ बाद १८५ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने १७.४ षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरचा दमदार शतकी तडाखा व्यर्थ गेला.

मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेला मुंबई इंडियन्स-कोलकाता नाइट रायडर्स सामना मुलींसाठी समर्पित केला. या सामन्यासाठी ३६ स्वयंसेवी संस्थेतील मुली आणि २०० विशेष मुले अशा एकूण १९ हजार चिमुकल्यांना निमंत्रण दिले होते. मुलींच्या शिक्षणाला आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. 'खेळांमध्ये मुलींच्या सहभागासाठी हा सामना विशेष ठरणार आहे. 

तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

यंदा महिला प्रीमिअर लीगच्या (डब्ल्यूपीएल) तुफान यशाने सर्वांचे लक्ष वेधले. मुलींचे शिक्षण आणि त्यांचा खेळांमधील सहभाग वाढावा यासाठी आम्ही आमचे उपक्रम मुलींसाठी समर्पित करत आहोत,' असे मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी सांगितले. तसेच सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफ यांनी पूर्ण वानखेडे स्टेडियमवर फेरफटका मारला. यावेळी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान मैदानात उभं राहून मुलाखत देत होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि इशान किशनने त्याला खेचले आणि त्यांच्यासोबत घेऊन गेले. 

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला वादळी सुरुवात करून देताना केवळ २३ चेंडूंत संघाचे अर्धशतक झळकावले. इशानने यंदाचे पहिले वैयक्तिक अर्धशतक केवळ २१ चेंडूत पूर्ण केले. इम्पॅक्ट खेळाडू खेळलेला रोहितही चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत होता. सुयश शर्माने पाचव्या षटकात त्याला बाद करुन ही जोडी फोडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईसाठी जबरदस्त फटकेबाजी केली. सूर्या आपल्या जुन्या अंदाजात परतल्याचा आनंद मुंबईकरांना झाला. त्याचे अर्धशतक ७ धावांनी हुकले. रोहित ईशान यांची ६५ धावांची सलामी आणि सूर्या-तिलक यांनी केलेली ६० धावांची खेळाडूगीदारी मुंबईच्या विजयात मोलाची ठरली. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माझहीर खानइशान किशन
Open in App