तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

Virat Kohli vs Sourav Ganguly: विराट कोहली आणि सौरव गांगुलीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:39 AM2023-04-17T08:39:27+5:302023-04-17T08:59:20+5:30

whatsapp join usJoin us
Another video of Virat Kohli and Sourav Ganguly has surfaced. | तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना दोन दिवासांपूर्वीच म्हणजे १५ एप्रिलला झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात घडलेल्या एका गोष्टीची चर्चा आजही सोशल मीडियावर सुरु आहे, ती म्हणजे विराट कोहली आणि सौरव गांगुली. (Virat Kohli vs Sourav Ganguly) 

या सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू व सपोर्ट स्टाफ जेव्हा एकमेकांना हात मिळवत होते, तेव्हा विराट कोहली व सौरव गांगुली यांनी एकमेकांना हात मिळवणे टाळले. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

त्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुलीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली डग आऊटमध्ये बसला होता. यावेळी सौरव गांगुलीसह दिल्लीचे काही खेळाडू मैदानाच्या बाजूने जात असतात. तेव्हा विराट कोहली सौरव गांगुलीला तिरप्या नजरेने पाहत असल्याचे दिसून येत आहे.

सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून खूप मोठा राडा झाला होता. तसेच दोघांमध्ये वादही झाल्याचे वृत्त होते. भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला काढून टाकण्यात आले. त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्डकपनंतर विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रोहितकडे टी-२०चे नेतृत्व सोपवण्यात आले होते. बीसीसीआयने मर्यादीत षटकासाठी एक आणि कसोटीसाठी एक असे दोन कर्णधार असावे अशी भूमिका ठेवली असल्याने विराटच्या जागी रोहितची निवड करण्यात आली होती.

Web Title: Another video of Virat Kohli and Sourav Ganguly has surfaced.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.