Join us

Kieron Pollard vs Rashid Khan, IPL 2022 MI vs GT Video: राशिद खानचा ५ चेंडूंचा 'मास्टरप्लॅन' अन् धिप्पाड पोलार्डचा झाला 'गेम ओव्हर'

पोलार्डने १४ चेंडू खेळून केल्या फक्त ४ धावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:07 IST

Open in App

Kieron Pollard vs Rashid Khan, IPL 2022 MI vs GT Video: यंदाच्या हंगामात अव्वलस्थानी विराजमान असलेला गुजरात टायटन्स संघ शुक्रवारी गुणतालिकेत तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्स विरोधात पराभूत झाला. रोहित शर्मा, इशान किशनची दमदार सलामी आणि टीम डेव्हिडची शेवटच्या टप्प्यातील फटकेबाजी याच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकात १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी चांगली सुरूवात केली, पण अखेरीस त्यांना ५ धावांनी हार पत्करावी लागली. या सामन्यात राशिद खानने किरॉन पोलार्डची काढलेली विकेट विशेष आकर्षण ठरली.

मुंबईच्या फलंदाजीच्या वेळी रोहित शर्माच्या २८ चेंडूत ४३ धावा आणि इशान किशनच्या २९ चेंडूत ४५ धावांच्या बळावर संघाने दमदार सलामी दिली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी निराशा केली. पोलार्डकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याने अतिशय संथ खेळी केली. राशिद खानने त्याला अक्षरश: मूर्ख बनवून त्याची विकेट घेतली. पहिले दोन चेंडू लेग स्पिन आणि पुढील दोन चेंडू गुगली टाकल्यानंतर पाचव्या चेंडूवर नक्की कसं खेळावं, हे पोलार्डला समजलंच नाही. त्यामुळे तो सरळ रेषेत खेळायला गेला. त्याच वेळी चेंडू लेग स्पिन झाला आणि पोलार्डला गेम ओव्हर झाला.

पोलार्ड बाद झाल्यावर मुंबईसाठी चांगली खेळी कोण करणार, असा प्रश्न होता. पण टीम डेव्हिडने तो प्रश्न सोडवला. त्याने शेवटपर्यंत खेळपट्टी सांभाळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने २१ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. त्यात २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

टॅग्स :आयपीएल २०२२किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App