VIDEO : विराट कोहलीच्या खराब बॅटिंग फॉर्मची पॅट कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला?

Pat Cummins Trolled Virat Kohli, Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत असून पॅट कमिन्स विराटची खिल्ली उडवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:49 IST2025-02-05T16:48:17+5:302025-02-05T16:49:26+5:30

whatsapp join usJoin us
VIDEO Pat Cummins trolled Virat Kohli poor batting form saying he has never seen him batting so slowly Champions Trophy Ind vs Aus | VIDEO : विराट कोहलीच्या खराब बॅटिंग फॉर्मची पॅट कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला?

VIDEO : विराट कोहलीच्या खराब बॅटिंग फॉर्मची पॅट कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pat Cummins Trolled Virat Kohli, Viral Video : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व खेळाडूंना रणजी सामने खेळण्याचे आदेश दिले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी १० कठोर नियम बनवले. त्यापैकी एक म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंना रिकाम्या वेळेत देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल. त्यामुळेच रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत सर्वच खेळाडूंनी आपल्या घरच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळले. ऑस्ट्रेलिया मालिकेपाठोपाठ विराट रणजीमध्येही फ्लॉप ठरला. त्यानंतर, एक व्हिडीओ व्हायरल होत असून पॅट कमिन्स विराटची खिल्ली उडवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची एक जाहिरात समोर आली आहे. ज्यामध्ये त्याने भारतीय फलंदाज विराट कोहलीला डिवचल्याचे म्हटले जात आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली खेळणार आहे. कसोटी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर आता त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीवर सर्वांची नजर आहे. तशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. जाहिरातीत पॅट कमिन्स आरशासमोर उभा आहे. तो कोहलीबद्दल बोलताना दिसत आहे. 'कोहली, तुला इतकं संथ खेळताना मी कधीही पाहिलेलं नाही' असं म्हणत तो त्याच्या स्ट्राइक रेटवर आणि बॅटिंग फॉर्मवर जोरदार टीका करताना दिसत आहे. स्पर्धेत कोहलीविरुद्ध फलंदाजी करायला येतो तेव्हा त्याची लय कशी बिघडवायची. या मजेदार क्लिपमध्ये कमिन्स आरशासमोर दाढी करताना आणि भारतीय स्टारच्या स्ट्राइक रेटवर टीका करताना दिसत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-

खरं तर हा व्हिडीओ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी बनवण्यात आला आहे. या व्हिडीओत पॅट कमिन्सला काही खेळाडूंना ट्रोल करायला सांगितले आहे. त्यानुसार तो दिलेली वाक्य बोलताना दिसत आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची रंगीत तालीम भारत विरूद्ध इंग्लंड वनडे क्रिकेट मालिका असणार आहे. या मालिकेची सुरुवात ८ तारखेपासून होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीसह अनेक दिग्गज भारतीय संघाचा भाग असणार आहेत. त्यामुळे ही द्विपक्षीय मालिका महत्त्वाची असणार आहे.

Web Title: VIDEO Pat Cummins trolled Virat Kohli poor batting form saying he has never seen him batting so slowly Champions Trophy Ind vs Aus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.