Join us

VIDEO : पांड्या आणि धवनचा हटके डान्स, सोशल मीडियावर व्हायरल 

आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू  मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 01:41 IST

Open in App

डुब्लिन - आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू  मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. इंग्लंडविरूध्दच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी केवळ खेळपट्टीशीच नाही, तर येथील नृत्याशीही जुळवून घेतले आहे.भारतीय संघातील दोन प्रमुख खेळाडू इंग्लिश गाण्यावर हटके डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या आणि शिखर धवन हे दोन खेळाडू इंग्लिश गाण्यावर थिरकले. पांड्याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर या नृत्याचा व्हिडिओ शेअर केला आणि बघताबघता तो व्हायरल झाला. पाहा कसा आहे, पांड्या व धवनचा डान्स...

दरम्यान, गेल्या दोनदिवसांपूर्वी झालेले आयर्लंडविरूध्दचे दोन सामने भारताने सहज जिंकले. भारताने पहिल्या लढतीत ७६, तर दुसऱ्या लढतीत १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी -२० सामन्यांच्या मालिकेला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

टॅग्स :क्रिकेटभारतशिखर धवनहार्दिक पांड्याक्रीडा