Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

गिल धावत निघाला पण गोलंदाजाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:26 PM2022-05-03T20:26:28+5:302022-05-03T20:28:24+5:30

whatsapp join usJoin us
Video of Shubman Gill Run Out by superb fielding Rishi Dhawan accurate throw ipl 2022 gt vs pbks live watch | Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: पंजाब किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातचा संघ १६ गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल आहे. त्यामुळे गुजरातने संघात कोणताही बदल केला नाही. पंजाबच्या संघानेही संघात फारसा बदल केला नाही. त्यानंतर सामना सुरू होताच तिसऱ्या षटकात शुबमन गिलसोबत एक दुर्दैवी प्रसंग घडला. रिषी धवनने उत्तम फिल्डिंग केलीच, पण गिलच्या कमनशिबामुळे त्याला स्वस्तात बाद व्हावे लागले.

गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल जोडी मैदानात उतरली. पहिल्या दोन षटकात त्यांनी चांगली सुरूवात करत १७ धावा केल्या. तिसऱ्या षटकात मात्र शुबमन गिलला आपली विकेट गमवावी लागली. संदीप शर्माने षटकाचा पहिला चेंडू टाकला. गिलने चेंडू मिड-ऑफला मारला आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या रिषी धवनने वेगाने धावत येत चेंडू अडवला आणि स्टंपवर मारला. चेंडू स्टंपवर लागल्याने गिल बाद झाला. पण तो नाखुश झाला. त्याचे कारण म्हणजे, शुबमन गिल धावत असताना संदीप शर्मा मध्ये आल्याने त्याला बाजूला व्हावे लागले आणि धाव पूर्ण करण्यास अवघ्या काही सेकंदांचा उशीर झाल्याने तो बाद झाला.

धाव घेण्यासाठी काही सेकंदांचा उशीर; शुबमन गिलने गमावली विकेट, पाहा व्हिडीओ-

दरम्यान, बाद झाल्यावर गिलने संदीप शर्माकडे बघून आपली नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये अतिशय शांतपणे एक छोटासा संवाद झाला. त्यानंतर 'आपलं दुर्दैव' मानून शुबमन गिल माघारी तंबूत परतला. त्याने ६ चेंडूत २ चौकारांसह ९ धावा केल्या होत्या.

Web Title: Video of Shubman Gill Run Out by superb fielding Rishi Dhawan accurate throw ipl 2022 gt vs pbks live watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.