Join us

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे यंदाचे पर्व १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 09:56 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे यंदाचे पर्व १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी उत्सुक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आयपीएलचे वेळापत्रत पुढे ढकलण्यात आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने त्यांचे सराव शिबीर रद्द केले. त्यानंतर धोनीने चेन्नई शहर सोडले. रांचीत पोहोचताच धोनीनं बाईक राईड केली आणि चाहत्यांसोबत सेल्फीही काढला.

आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर धोनीने आपला लुक बदलला आणि फ्रेंचकट दाढी ठेवली आहे. रांचीच्या रस्त्यांवर धोनीनं रस्त्यांवर बाईक राईड केली. कोरोना व्हायरसमुळे सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आहे, परंतु धोनीच्या बाईक राईड आणि सेल्फीवर टीका होत आहे.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबाईकचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2020