हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न

लॉकडाऊनच्या काळात हसीन जहाँनं इंस्टाग्रामवर अनेक व्हिडीओ पोस्ट केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 11:22 IST2020-07-23T11:22:17+5:302020-07-23T11:22:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video made by Hasin Jahan on Himesh Reshammiya's song; Netizens asked the 'funny' question | हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न

हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न

कोरोना संकटात जेवढी लोकप्रियता भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाली नसेल तेवढी त्याच्या पत्नी हसनी जहाँला मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात हसीन जहाँनं इंस्टाग्रामवर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आणि त्यावर नेटिझन्सनी भन्नाट कमेंट्सही केल्या. काही दिवसांपूर्वी हसीन जहाँनं न्यूड फोटो पोस्ट केला होता आणि त्यावेळी तिला नेटिझन्सच्या संतापाचा सामना करावा लागला होता. आता हसीन जहाँचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात ती हिमेश रेशमियाचं गाणं गाताना दिसत आहे. त्यावरूही नेटिझन्सनी तिला खोचक प्रश्न विचारला आहे. 

भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा...

हिमेश रेशमियाच्या 'तेरी मेरी, तेरी मेरी कहानी', या गाण्यावर हसीन जहाँनं हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यावर एकानं लिहिलं की, शमी भाईची आठवण येतेय का तुला? हसीन आणि शमी सोबत राहत नाहीत. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर कौटुंबीक अत्याचाराचा आरोप केला आहे. तिनं न्यायालयातही धाव घेतली आहे. शिवाय तिनं शमीवर फिक्सिंगचे आरोपही केले होते, परंतु बीसीसीआयनं चौकशी करून शमीला क्लीन चिट दिली. 

Web Title: Video made by Hasin Jahan on Himesh Reshammiya's song; Netizens asked the 'funny' question