भारतापाठोपाठ क्रिकेटचे सर्वाधिक चाहते कुठे असतील तर ते पाकिस्तानात... पण, २००९साली श्रीलंकन संघावर दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यानंतर देशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदच झाले होते. पण, मागील काही वर्षांपासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतले आहे आणि पुढील महिन्यात न्यूझीलंड व इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे मागील वर्ष अनेक आंतरराष्ट्रीय सामना लाहोर आणि कराची येथेच खेळवले गेले. त्याआधी मुल्तान व फैसलाबाद येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जायचे. पण, भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड येथे असलेल्या स्टेडियमच्या तुलनेत पाकिस्तानात अजूनही त्या दर्जाचे नाहीत. अशात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या खानेवाल स्टेडियमची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला आहे. या स्टेडियमवर चक्क फळभाज्यांची शेती केली जात आहे.
ARY Newsनं दिलेल्या माहितीनुसार खानेवाल येथील स्टेडियमसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जांची सर्व सुविधा आहेत, परंतु आता या स्टेडियमवर शेतकरी शेती करत आहेत. या स्टेडियमवर किमान स्थानिक सामने होण्याची अपेक्षा होती, परंतु येथे आता मिरची, भोपळा आदी फळ भाज्यांची शेती होत आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. तसेच पुढील वर्षी फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तान दौरा करणार आहे.