Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:34 AM2021-08-18T10:34:51+5:302021-08-18T10:35:59+5:30

टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

PM narendra modi interacts with Silver medalist weightlifter mirabai chanu; says the country is extremely proud of you!  | Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!

Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!

Next

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं पटकावून दिलं. २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu)  ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. (  PM Narendra Modi interaction with Tokyo 2020 Olympic contingent) यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, पुरुष हॉकी संघातील खेळाडू यांच्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी मोदींनी मीराबाई चानूचे कौतुक केले.

मीराबाई हिनं तिच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या खडतर काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत. तिच्या याच कृतज्ञतेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. ते म्हणाले,''तू पदक जिंकून देशाचं नाव आणखी मोठं केलंस, पण तुझ्या एका कृतीनं मी खूप आनंदी आहे. तू ड्रायव्हर्सचा केलेला सत्कार. पदक जिंकण्याचा अभिमान बाळगणं आणि त्यानंतर आठवणीनं त्यांचा सत्कार करणं, हे आपल्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन आहे. यातून देशातील सर्व लोकांना प्रेरणा मिळेल आणि हेच लोग होते की ज्यांचा तुझ्या यशात वाटा आहे.  

Anand Mahindra : मीराबाई चानूमुळे उद्योगपती आनंद महिंद्रा गहिवरले; म्हणाले, माझ्यासाठी ती आता गोल्ड मेडलिस्ट!

Web Title: PM narendra modi interacts with Silver medalist weightlifter mirabai chanu; says the country is extremely proud of you! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.