Join us

Kane Williamson vs Mohammad Shami, IPL 2022 GT vs SRH Live: भन्नाट गोलंदाजी! टप्पा पडताच विल्यमसनने बॅट फिरवली पण...

काही कळायच्या आतच विल्यमसनची झाली दांडी गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 20:42 IST

Open in App

Kane Williamson vs Mohammad Shami, IPL 2022 GT vs SRH Live: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजी दिली. SRHचा कर्णधार केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे मैदानात आले. अभिषेक शर्माने गेल्या सामन्यात केलेली दणकेबाज खेळी या सामन्यातही सुरू ठेवली. त्याने मोहम्मद शमीची गोलंदाजी योग्य प्रकारे खेळली. पण शमीने विल्यमसनचा मात्र त्रिफळा उडवला.

मोहम्मद शमी हा पॉवर प्ले दरम्यान विकेट मिळवून देणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडून हार्दिक पांड्याला खूप अपेक्षा होत्या. अभिषेक शर्माने योग्य प्रकारे त्याची गोलंदाजी खेळून काढली. पण विल्यमसन मात्र शमीचा शिकार झाला. गुड लेंग्थवर टप्पा पडलेला चेंडू झटकन स्विंग झाला. विल्यमसनला चेंडू समजला नाही. त्यामुळे त्याने चुकीचा फटका खेळला आणि तो क्लीन बोल्ड झाला. पाहा व्हिडीओ-

सनरायझर्स हैदराबादचा संघ- अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (किपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन

गुजरात टायटन्सचा संघ- वृद्धिमान साहा (किपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

टॅग्स :आयपीएल २०२२मोहम्मद शामीकेन विल्यमसनहार्दिक पांड्या
Open in App