Join us

Video: जसप्रीत बुमराह, नवदीप सैनीचा भेदक मारा पाहून ऑसींच्या मनात धडकी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला वन डे सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 09:52 IST

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला वन डे सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं अंतिम अकरा शिलेदार कोण असतील, याचे संकेत दिले. यापूर्वी हे दोन प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांना वन डे मालिकेत भिडले होते, तेव्हा ऑस्ट्रेलियानं यजमानांवर 3-2 असा विजय मिळवला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर झालेल्या त्या पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार टीम इंडियानं केला आहे.

या सामन्यातून जसप्रीत बुमराह बऱ्याच विश्रांतीनंतर वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. जगातील अव्वल गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज असा हा आजचा सामना असणार आहे. पण, या सामन्यापूर्वीच बुमराहचा भेदक मारा पाहून ऑसी खेळाडूंच्या मनात धडकी नक्की भरली असेल.

भारतीय संघानं सोमवारी वानखेडे स्टेडियमवर कसून सराव केला. जसप्रीतनं नेट्समध्ये भेदक मारा केला. त्याच्यासोबत आज नवदीप सैनी की शार्दूल ठाकूर यांच्यापैकी कोण खेळेल, हे गुलदस्त्यात आहे. पण, नेट्समध्ये या दोघांची भेदक गोलंदाजी पाहून ऑसी फलंदाज नक्की टेंशनमध्ये आले असतील. बुमराह आणि सैनी यांनी नेट्समध्ये वेगवान माऱ्यानं स्टम्प तोडल्याचे दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ...

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह

वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहआॅस्ट्रेलिया