Hardik Pandya Mahieka Sharma sleeping video: टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आणि घरच्या मैदानावर जिंकणारा पहिला संघ बनला. या आनंदात अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा एक रोमँटिक सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक संमिश्र चर्चा रंगल्या आहेत.
हार्दिक आणि माहिका भरमैदानात स्टेजवर झोपले...
अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबियांसोबत विजय साजरा केला. अंतिम विजयानंतर लगेचच माहिका शर्मा हार्दिकला भेटण्यासाठी मैदानावर धावली. तिने त्याला मिठी मारली आणि गालावर चुंबन घेतले. दोघांनी एकत्र डान्स करत सेलिब्रेशनही केले. त्यानंतर काही क्षणानी ते स्टेजवर बसले आणि मग तिथे काही सेकंदांसाठी झोपले आणि आराम करत असल्याचे दिसून आले. हा क्षण चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. तो व्हिडीओही तुफान व्हायरल झाला आहे.
माहिका 'लकी चार्म'
सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने माहिकाला आपला "लकी चार्म" म्हटले. तो म्हणाला की जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून त्याचे नशीब चमकत आहे आणि त्याचे यशही बहरत आहे. नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट झाल्यापासून महिका शर्मा त्याच्या आयुष्यात आहे. हे दोघे सुमारे एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ४५ दिवसांच्या संपूर्ण स्पर्धेत, माहिका प्रत्येकवेळी हार्दिकला पाठिंबा देताना दिसली आहे. इतकेच नव्हे तर हार्दिकचा मुलगा अगस्त्यदेखील माहिकासोबत असल्याचे दिसले आहे.
हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी
हार्दिक पांड्यासाठी ही स्पर्धा उल्लेखनीय होती. त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने नऊ सामन्यांमध्ये १६०.७४ च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाज म्हणून त्याने नऊ विकेट्सही घेतल्या. संघाच्या विजयात त्याची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची होती. विजयानंतर, हार्दिकने ट्रॉफी जिंकत राहण्याची आणि आणखी अनेक जेतेपदे मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.