Hardik Pandya Catch, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ च्या ग्रुप अ सामन्यात भारताने ओमानचा २१ धावांनी पराभव केला. टीम इंडियासाठी हा विजय म्हणावा तितका सोपा नव्हता. ४३ वर्षीय फलंदाज आमिर कलीमच्या खेळीमुळे ओमान मजबूत स्थितीत आला होता, परंतु अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या एका चमत्कारिक झेलमुळे सामना पलटला. हार्दिक पंड्याच्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याचा अद्भूत झेल
सामन्यात ओमानसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य होते. एका क्षणी कलीमच्या खेळीमुळे ओमानला विजयाची आशा होती, पण हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल टिपत त्या आशा धुळीस मिळवल्या. कलीमने ४६ चेंडूत ६४ धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. शेवटच्या क्षणी, ओमानला विजयासाठी १४ चेंडूत ४० धावांची आवश्यकता होती आणि कलीम तुफान फॉर्ममध्ये होता. त्यावेळी १८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, हार्दिक पांड्याच्या चपळतेने झेल टिपला. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर त्याने स्वीप शॉट खेळला, तेव्हा हार्दिक पांड्याने सीमारेषेवर एका हाताने झेल टिपला. पाहा झेल घेतल्याचा व्हिडीओ-
हार्दिक पांड्याने घेतलेला झेल सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्याच्या दमदार फिल्डिंगच्या जोरावर कलीम बाद झाला. तसेच, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजीही केली. त्याने महत्त्वाच्या षटकांमध्ये भेदक मारा करत चार षटकांमध्ये फक्त २६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. अखेर टीम इंडियाने २१ धावांनी विजय मिळवला.