Join us

Video : डेव्हिड वॉर्नर बनला सुपर हिरो थॉर; ज्युनिअर NTRलाही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर टिक टॉक व्हिडीओनं आपलं मनोरंजन करत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 18:19 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर टिक टॉक व्हिडीओनं आपलं मनोरंजन करत आहे. टिक टॉकवर पदार्पण केल्यापासून वॉर्नर रोज एक व्हिडीओ पोस्ट करत आहे आणि त्याला त्याच्या मुली व पत्नीचीही साथ मिळत आहे. बुधवारी वॉर्नरनं असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तो एव्हेंजर पात्र थॉरच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय त्यानं दुसऱ्या व्हिडीओत पत्नीसोबत डान्स करून दाक्षिणात्य हिरो ज्युनिअर NTR याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्युनिअर NTRला शुभेच्छा देताना त्यानं पत्नी कँडीससह 'पक्का लोकल' या गाण्यावर डान्स केला.   

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरटिक-टॉक