Join us

Video : डेव्हिड वॉर्नर अभिनेत्री रश्मिका मंदानाला म्हणाला, I’m sorry; युवराज सिंगची कमेंट चर्चेत

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) येत्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी बातमी येऊन धडकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:00 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियाला सुपर १२ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) येत्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी बातमी येऊन धडकली. आता वॉर्नरच्या एका व्हिडीओची तुफान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो आणि आजही त्याने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. पण, या व्हिडीओपेक्षा त्याने बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) हिची मागीतलेल्या माफीची रर्चा रंगली आहे.

वॉर्नरने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो अभिनेत्रीच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. वॉर्नरने आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या अनेक गाण्यांवर किंवा संवादांवरील व्हिडीओ पोस्ट केले होते. पण, आज पहिल्यांदा त्याने प्रथमच अभिनेत्रीच्या रुपातील व्हिडीओ पोस्ट केला. हे गाणं रश्मिक मंदानाचं असावं असा अंदाज बांधला जातोय.. कारण वॉर्नरने त्याच्या पोस्टखाली I’m all sorry Rashmika Mandanna असे लिहिले आहे.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नररश्मिका मंदाना
Open in App