Join us

Video: अफलातून! फलंदाजाने मारला जोरदार फटका; गोलंदाजांने घेतला भन्नाट झेल

फॉलो थ्रूमध्ये असा जादुई झेल फार कमी वेळा पाहायला मिळाला असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:24 IST

Open in App

Logan van Beek catch video: 'कॅचेस विन मॅचेस' म्हणजेच सामना जिंकायचा असेल तर झेल घ्या, असा एक नियम क्रिकेटमध्ये सांगितला जातो. क्रिकेटमध्ये कायमच झेल घेण्याला महत्त्व असते. एका झेलामुळे अख्ख्या सामन्याचा निकाल बदलताना अनेक वेळा चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. सामन्यात दमदार झेल घेण्यासाठी अनेक खेळाडू प्राण पणाला लावताना दिसतात. त्यात नुकताच असा एक झेल घेण्यात आला जो झेल सर्वसामान्यपणे घेणे शक्य नसल्याची चर्चा आहे.

फॉलो थ्रूमध्ये असा जादुई झेल घेताना गोलंदाजाला आपण यापूर्वी फार कमी वेळा पाहिले असेल. असा अप्रतिम झेल घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव आहे लोगान व्हॅन विक. लोगान व्हॅन विक जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो, तेव्हा तो नेदरलँड संघाकडून असतो. पण, सध्या त्याच्या हा झेल न्यूझीलंडच्या मैदानावर पाहायला मिळाला. २२ जानेवारीला देशांतर्गत T20 टूर्नामेंट सुपर स्मॅशमध्ये खेळताना त्याने स्वत:च्या गोलंदाजीवर जबरदस्त झेल घेतला.

हा सामना कँटरबरी आणि वेलिंग्टन या संघांमध्ये होता. या सामन्यात लोगान व्हॅन विक हा वेलिंग्टन संघाचा भाग होता. या सामन्यात कँटरबरीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७८ धावा केल्या. कँटरबरीसाठी टॉम लॅथमने सर्वाधिक ६० धावा केल्या. लॅथम शतकाकडे वाटचाल करत होता, पण लोगान व्हॅन विकने त्याला अप्रतिम झेल टिपत बाद केले. एका हाताने पकडलेला लोगानचा हा झेल सर्वोत्तम कॅचेसपैकी एक मानला जात आहे. लोगानने अप्रतिम झेल टिपला असला तरी त्याचा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला त्याचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १६० धावा केल्या आणि सामना १८ धावांनी गमावला.

टॅग्स :सोशल मीडिया