Join us

Video: 'हा' पडला, 'तो' धडपडला अन् रन-आउटचा भारी किस्सा घडला!

मतीदार रनआऊटच्या दोन घटना क्रिकेट जगतामध्ये घडल्या असून चाहते त्यांना चांगलेच ट्रोल करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 14:05 IST

Open in App
ठळक मुद्देदोन फलंदाज सध्या सुरु असलेल्या सामन्यांमध्ये विचित्रपद्धतीने रनआऊट झाले आणि त्यानंतर त्यांची सोशल मीडियावर चांगलीच फे फे उडवली गेली.

नवी दिल्ली : क्रिकेटचे काही साधे नियम असतात. ते जर तुम्ही पाहिले नाहीत तर तुम्ही ट्रोल व्हायला सुरुवात होता. दोन फलंदाज सध्या सुरु असलेल्या सामन्यांमध्ये विचित्रपद्धतीने रनआऊट झाले आणि त्यानंतर त्यांची सोशल मीडियावर चांगलीच फे फे उडवली गेली. गमतीदार रनआऊटच्या दोन घटना क्रिकेट जगतामध्ये घडल्या असून चाहते त्यांना चांगलेच ट्रोल करत आहेत.

ऑस्ट्रेलियाच आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अबुधाबी येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पीटर सिडल 53वे षटक टाकत होता. त्यावेळी त्याचा एक चेंडू पाकिस्तानच्या अझर अलीने गलीच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू चौकार जाईल, असे वाटत होते. पण हा चेंडू सीमारेषेजवळ जाण्यापूर्वीच थांबला. मिचेल स्टार्कने हा चेंडू अडवला आणि थेट यष्टीरक्षक टीम पेनकडे फेकला. अझर आपला सहकारी शफिकबरोबर त्यावेळी संवाद साधत होता. त्यामुळे विचित्रपद्धतीने तो रनआऊट झाला. 

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या प्लंकेट शिल्डमध्येही असाच एक विचित्र प्रकार घडला आहे. धाव काढताना दोन्ही खेळाडू मैदानात पडले आणि त्यामुळेच एक विचित्र रनआऊट चाहत्यांना पाहायला मिळाला.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियान्यूझीलंड