Join us

Video: कॅप्टन कूल धोनीला जेव्हा राग येतोय, कुलदीप चहलला दिला इशारा...

आशिया चषक 2018 स्पर्धेतील मंगळवारचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. नवख्या अफगाणिस्तानने शेवटपर्यंत लढा देता भारतीय संघाला विजयापासून रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 13:03 IST

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तानी चाहत्याकडून धोनीच्या कर्णधारपदाचे कौतूक

दुबई - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच ओळख कॅप्टन कूल अशी आहे. मात्र, कूल कर्णधार धोनीलाही राग येतो हे मंगळवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मंगळवारी रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान, धोनीने कुलदीप यादवला रागावले. तसेच बॉलिंग करतोस की चेंज करू... असा इशाराही धोनीने कुलदीपला दिला. 

आशिया चषक 2018 स्पर्धेतील मंगळवारचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. नवख्या अफगाणिस्तानने शेवटपर्यंत लढा देता भारतीय संघाला विजयापासून रोखले. त्यामळे हा सामना अनिर्णित स्थितीत राहिला. विशेष म्हणजे या सामन्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. तर टीम इंडियाच्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनीची निवड करण्यात आली होती. मात्र, कर्णधार नसतानाही मैदानात कर्णधारपदाच्या जबाबदारीने धोनीला वावरताना आपण पाहिले आहे. पण, मंगळवारच्या सामन्यात धोनीमधील कर्णधार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. कारण, भारताच्या गोलंदाजीवेळी कुलदीप चहलवर धोनी रागावल्याचे पाहायला मिळाले. कुलदीप यादव क्षेत्ररक्षणाबाबत काही सूचना करत होता. त्यावेळी, धोनीने कुलदीपला सज्जड दम दिला. बॉलिंग करेगा या चेंज करू.. अशा शब्दात धोनीने कुलदीपला सुनावले. एका पाकिस्तानी ट्विटर युजर्संने याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये धोनीचा आवाज स्पष्टपणे जाणवतो. तर, या ट्विटर युजर्संने धोनीच्या कर्णधारपदाचे कौतूक केलं आहे. धोनी त्यांच्या निर्णयावर ठाम असतो, तो मानसिकरित्या दमदार निर्णय घेतो, म्हणूनच धोनी उत्कृष्ट कर्णधार असल्याचे या चाहत्याने म्हटले आहे.  पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीकुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघआशिया चषक