Avishka Fernando Power Hitting Batting Video : दुबईत सध्या ILT20 लीग खेळली जात आहे. शनिवारी स्पर्धेतील आठवा सामना शारजाह वॉरियर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शारजा संघाच्या अविष्का फर्नांडोने विक्रमी खेळी खेळली. २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने केवळ २७ चेंडूत ३०० च्या स्ट्राईक रेटने ८१ धावा कुटल्या. या दरम्यान त्याने ८ षटकार आणि ६ चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे शारजा संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केवळ १८.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात केला.
ILT20 इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक
प्रथम फलंदाजी करताना दुबई कॅपिटल्स संघाने २० षटकांत २०१ धावा केल्या. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या शारजाह वॉरियर्सच्या संघाने सहाव्या षटकातच ५६ धावांवर पहिली विकेट गमावली. जॉन्सन चार्ल्स १९ चेंडूत ३७ धावांची तुफानी खेळी खेळून बाद झाला. यानंतर श्रीलंकेचा फलंदाज अविष्का फर्नांडो क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने येताच धमाका सुरू केला आणि अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक केले. यासह त्याने ILT20 च्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी खेळाडू आझम खानच्या नावावर होता. गेल्या मोसमात त्याने १८ चेंडूत अर्धशतक केले होते.
शारजा संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या, पण अविष्का थांबला नाही. त्याने तुफान फटकेबाजी केली. इतर फलंदाजांनीही वेगवान खेळी केल्याने ११ चेंडू शिल्लक असतानाच शारजाने २०२ धावांचा यशस्वी पाठलाग केला.
Web Title: VIDEO Avishka Fernando Power Hitting scored 81 runs in just 27 runs at a strike rate of 300, hit 8 sixes, team won ILT20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.