237 Runs in 72 Balls : २० चौकार, २४ षटकार; ऑस्ट्रेलियन फलंदाज Chris Thewlisनं ७२ चेंडूंत कुटल्या २३७ धावा, Video

ऑस्ट्रेलियन प्रीमिअर क्रिकेटमध्ये मेलबर्नच्या फलंदाजानं सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:55 PM2022-01-25T13:55:07+5:302022-01-25T13:55:49+5:30

whatsapp join usJoin us
Video: Australian Batsman Smashes 237 Runs in 72 Balls in Victoria Premier Cricket,  | 237 Runs in 72 Balls : २० चौकार, २४ षटकार; ऑस्ट्रेलियन फलंदाज Chris Thewlisनं ७२ चेंडूंत कुटल्या २३७ धावा, Video

237 Runs in 72 Balls : २० चौकार, २४ षटकार; ऑस्ट्रेलियन फलंदाज Chris Thewlisनं ७२ चेंडूंत कुटल्या २३७ धावा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियन प्रीमिअर क्रिकेटमध्ये मेलबर्नच्या फलंदाजानं सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. व्हिक्टोरिया प्रीमिअर क्रिकेट second grade स्पर्धेत कॅम्बरवेल मॅगपीस ( Camberwell Magpies) संघाचा सलामीवीर ख्रिस थेवलीस ( Chris Thewlis) यानं ७२ चेंडूंत २३७ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत २० चौकार व २४ षटकारांची आतषबाजी होती. त्यानं किंग्स्ट हॉथॉर्न संघाच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. 

नाणेफेक जिंकून कॅम्बरवेल संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ख्रिस थेवलीसनं ७२ चेंडूंत २३७ धावांची खेळी केली. त्यानं ७२ पैकी ४४ चेंडूंत चौकार-षटकरांनी धावा केल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर कॅम्बरवेल संघानं ५० षटकांत ४ बाद ४४१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात किंग्स्टनचा संघ ८ बाद २०३ धावाच करू शकला.  

ख्रिस जेव्हा २३६ धावांवर होता तेव्हा किंग्स्टनच्या गोलंदाजानं टाकलेल्या स्लोव्हर चेंडूवर त्यानं डिप लेग साईटला फटका मारला. पण, किंग्स्टनच्या खेळाडूनं कॅच सोडला अन् तेव्हा गोलंदाजाचा चेहरा पाहण्यासारखा होता. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 


Fox Sportsच्या माहितीनुसार ख्रिसची ही ७२ चेंडूंतील २३७ धावांची खेळी ही व्हिक्टोरीयन प्रीमिअर क्रिकेट second-grade स्पर्धेच्या इतिहासातील सहावी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. मॉर्गन पर्सन क्लार्क यानं २०१५-१६मध्ये नाबाद २५४ धावा केल्या होत्या.  



 
 

Web Title: Video: Australian Batsman Smashes 237 Runs in 72 Balls in Victoria Premier Cricket, 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.