Join us

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये कसून सराव करताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 12:00 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये कसून सराव करताना दिसला. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतण्यासाठी कोहली उत्सुक असला तर लॉकडाऊमुळे त्याला घरीच रहावे लागणार आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्मा बॅट हातात घेत क्रिकेटचा सामना खेळला. विराट-अनुष्का यांच्यात रंगलेला क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अनुष्कानं बाऊंसर टाकून टीम इंडियाच्या कर्णधाराला आश्चर्यचकीत केलं.

क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्या 14 बेस्ट रोमँटिक स्टोरी! 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर! 

विराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरल

या व्हिडीओमध्ये कोहलीच्या गोलंदाजीवर अनुष्कानं सुरुवातीला फटकेबाजी केली. त्यानंतर गोलंदाजीतही अनुष्कानं कोहलीला हतबल केलं.  

पाहा व्हिडीओ...  दरम्यान, कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलिसांनाही मदत केली आहे. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची आहे.  मुंबईचो पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी विराट-अनुष्कानं मदत केल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विट केलं की,''कोरोना विरुद्ध लढणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये निधी स्वरुपात दिले आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला

Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल

पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा