Join us

Ranji Trophy : 'रावडी' राठोड शो! विदर्भकर यशच्या सेंच्युरीनं वाढवलं मुंबईकरांच टेन्शन

यंदाच्या रणजी हंगामात त्याच्या भात्यातून निघालेले हे पाचवे शतक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:27 IST

Open in App

Ranji Trophy 2024-25 Vidarbha vs Mumbai, Semi Final 2 : एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा माहोल तापला असताना दुसऱ्या बाजूला नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना रंगला आहे. गत हंगामातील महाराष्ट्रातील दोन फायनलिस्ट विदर्भ आणि मुंबई यांच्यात फायनल तिकीट मिळवण्यासाठी शर्यत रंगली असून या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळात विदर्भ संघानं सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केलीये. यात यश राठोड याच्या दमदार शतकासह अक्षय वाडकरच्या अर्धशतकी खेळीचा महत्त्वाचा वाटा आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहिल्या डावात अर्धशतक, मग शतकी खेळीसह साधला मोठा डाव 

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सेमी फायनल लढतीत यश राठोडनं दमदार खेळी करताना यंदाच्या हंगामातील पाचवे शतक झळकावत सर्वांचे लक्षवेधून घेतले. एवढेच नाही त्याच्या या शतकी खेळीमुळे दिग्गज स्टार्संनी बहरेलेला गत रणजी चॅम्पियन मुंबईचा संघ आता बॅकफूटवर गेला आहे. मुंबई विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत पहिल्या डावात यश राठोडनं अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने आपल्या शतकी खेळीसह संघाला ३५० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 

 मुंबईच्या ताफ्यातून आलं सामन्यातील पहिल शतक, पण... 

 सेमी फायनल लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्या डावात विदर्भ संघानं ३८३ धावा केल्या होत्या. यात यश राठोडच्या ५४ (११३) अर्धशतकासह  ध्रुव शौरी ७४ (१०९)  आणि दानिश मल्लेवार ७९ (१५७) यांच्या भात्यातूनही फिफ्टी आली. पण एकालाही शतकी आकडा गाठता आला नव्हता. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या ताफ्यातील स्टार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही मंडळी स्वस्तात आटोपल्यावर  आकाश आनंदच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने पहिल्या डावात २७० धावांपर्यंत मजल मारली होती. या शतकी खेळीमुळे मुंबईचा संघ पुन्हा सामन्यात येईल, असे वाटत होते.

यश राठोडच्या शतकी खेळीमुळे मुंबईच्या संघाचं वाढलं टेन्शन, कारण...

पण यश राठोडच्या दुसऱ्या डावातील शतकामुळे मुंबई संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानात शेवटपर्यंत काय होईल? याचा अंदाज लावणं कठीण असलं तरी यशच्या शतकामुळे मुंबईचा फायनलचा मार्ग कठीण झालाय असं चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :रणजी करंडकमुंबईविदर्भ