Join us

विराट कोहलीच्या ३६ व्या वाढदिवशी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा...

Virat Kohli Birthday: माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा मंगळवारी ३६ वा वाढदिवस झाला. विराटच्या वाढदिवशी सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 06:13 IST

Open in App

नवी दिल्ली - माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा मंगळवारी ३६ वा वाढदिवस झाला. विराटच्या वाढदिवशी सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेक क्रिकेटपटूंनी विराटसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करीत विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी खेळाडू युवराजसिंग याने विराटसोबतच्या आठवणींचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. युवराज म्हणाला, 'विराट, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण जग तुझ्या क्रिकेटमधील धडाकेबाज पुनरागमनाची वाट पाहत आहे. तू याआधी खूप काही मिळवले आहेस आणि मला खात्री आहे की, या पुढेही मिळवशील. शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम!'

बीसीसीआयने अधिकृत द्विटर हँडलवरून फोटो पोस्ट करत विराटला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये बीसीसीआयने विराटच्या आतापर्यंत मिळालेल्या यशाची आकडेवारी मांडली आहे. त्यात लिहिले:- ५३८ : आंतरराष्ट्रीय सामने, २७१३४: एकूण धावा, २०११ : आयसीसी वन-डे विश्वचषक विजेता, २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता, २०२४ आयसीसी टी-२० विश्वचषक विजेता. माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज विराट तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'

हरभजन म्हणाला, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट कोहली! आश्वासक युवा प्रतिभेपासून ते आमच्या काळातील महान खेळाडूंपैकी एक असा तुझा प्रवास अभूतपूर्व होता. तू सर्वच महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, कठोर परिश्रम करण्यासाठी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केले आहेस. तुला उज्ज्वल आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा.

' रवी शास्त्री यांनी विराटला शुभेच्छा दिल्या. शास्त्री म्हणाले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा चॅम्पियन. लवकरच तुझा चांगला काळ सुरू होईल.' समालोचक आकाश चोप्राने आपल्या समालोचनाच्या अंदाजात विराटला अनोख्या शुभेच्छा दिल्या. 'त्याच दिवशी वाटले की, हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी वेगळे करून दाखवेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा एकमेवाद्वितीय विराट कोहली..'

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ