मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानात चांगलेच नाव कमावले. सचिनने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अजूनही त्याचे काही विश्वविक्रम अबाधित आहेत. पण एकेकाळी सचिन आणि बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीचे अफेअर होते, अशी जोरदार चर्चा होती. याबद्दल दस्तुरखुद्द सचिननेच काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता.
क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे फार जुने संबंध आहेत. काही क्रिकेटपटूंनी तर बॉलीवूडमधील अभिनेत्रींबरोबर लग्नही केली आहेत. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंची बॉलीवूडच्या सेलिब्रेटींबरोबर अफेअर्सही सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटला बॉलीवूड ही काही नवीन गोष्ट नाही.
सचिन आणि एका बॉलीवूडमधील अभिनेत्रीचे अफेअर आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती. ही चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु झाली की, ही बातमी थेट सचिनपर्यंत येऊन पोहोचली. सचिन नेहमीच न बोलता आपल्या बॅटनेच टीकाकारांना उत्तर देतो. पण सचिन या गोष्टीला चांगलाच वैतागला होता. पण त्यावेळी तो शांत बसला. पण काही महिन्यांपूर्वी एका खास मुलाखतीमध्ये सचिनने या गोष्टीचा उलगडा केला होता.
बॉलीवूडमधील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. सचिन आणि शिल्पा या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही असल्याच्या बातम्यांना एकेकाळी ऊत आले होते. या सगळ्या अफवांमुळे सचिन प्रचंड चिडला होता आणि मी शिल्पाला कधीच भेटलो नाही अशी प्रतिक्रिया त्याने प्रसारमाध्यमांना दिली होती तर शिल्पाने या प्रकरणात शांत राहाणेच पसंत केले होते.
सचिनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याच्याविषयी कोणत्या विचित्र अफवा त्याने ऐकल्या आहेत याविषयी सांगितले होते. त्याने म्हटले होते की, माझ्याविषयी मी वाचलेली सगळ्यात विचित्र अफवा म्हणजे माझे आणि शिल्पा शिरोडकरचे अफेअर आहे. आम्ही दोघे एकमेकांना ओळखत देखील नसल्याने याचा प्रश्नच येत नाही.
सचिनने ही प्रतिक्रिया दिल्यानंतर सचिन आणि शिल्पाच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. सचिनने यानंतर काहीच वर्षांत अंजलीशी तर शिल्पाने युकेतील अपरेश रंजीत या बँकरसोबत लग्न केले.