वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...

Vaibhav Suryavanshi Virat Kohli Team India : वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये आहे, तेथे असं काय घडलं... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 22:20 IST2025-07-18T22:19:36+5:302025-07-18T22:20:15+5:30

whatsapp join usJoin us
Vaibhav Suryavnashi playing in number 18 jersey in test cricket irked virat kohli fans angry on bcci | वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...

वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vaibhav Suryavanshi Virat Kohli Team India: वैभव सूर्यवंशी हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी या तरुण फलंदाजाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. वैभवने केवळ भारतातच नाही, तर जागतिक क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्याने IPL 2025 मध्ये आधीच आपली छाप सोडली होती. आता तो इंग्लंडमध्येही आपली छाप पाडत आहे. पण या तरुण फलंदाजाने षटकार आणि चौकारांचा वर्षाव करून अनेक विक्रम केले असले तरी, भारतीय चाहते आणि विशेषत: विराट कोहलीचे चाहते त्याचावर खूप नाराज आहेत. याचे कारण काय, जाणून घेऊया.

भारत आणि इंग्लंडमधील अंडर-१९ मालिकेत, वैभव सूर्यवंशीने त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी खूप प्रशंसा मिळवली. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेत, वैभवने फक्त ५२ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. वैभवच्या फलंदाजीव्यतिरिक्त, त्याच्या जर्सीनेही यावेळी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. कारण तो विराट कोहलीप्रमाणे १८ क्रमांकाची जर्सी घालून खेळायला आला. वैभवच्या जर्सीवरून मैदानात कोणताही वाद झाला नाही, पण या जर्सीने भारतीय चाहते नाखुश झाले. काही चाहत्यांना ते आवडले नाही आणि त्यांनी बीसीसीआयवर टीका केली. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर त्याच्या सन्मानार्थ या फॉरमॅटमधील इतर कोणत्याही खेळाडूला १८ क्रमांकाची जर्सी देऊ नये, अशी चाहत्यांनी मागणीही केली.

काही भारतीय चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका केली असली, तरीही काही चाहत्यांनी वैभवला हा जर्सी नंबर घालून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. विराट कोहलीचा वारसा पुढे चालव, असेही काहींनी म्हटले.

वैभवचा इंग्लंडमध्येही बोलबाला

दरम्यान, वैभवने ५ अंडर-१९ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. भारतानेही मालिका ३-२ अशी जिंकली. याशिवाय, कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर, वैभवने दुसऱ्या डावात जलद अर्धशतक झळकावले.

Web Title: Vaibhav Suryavnashi playing in number 18 jersey in test cricket irked virat kohli fans angry on bcci

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.