Vaibhav Suryavanshi viral video: भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ पासून चर्चेत आला. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीच्या जोरावर आपल्या संघाला अनेकवेळा चांगली सुरूवात मिळवून दिली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर अवघ्या १४व्या वर्षी वैभवला ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळाले. सध्या तो ऑस्ट्रेलियात सामना खेळत आहे. याचदरम्यान, आतापर्यंत कौतुकास्पद कामगिरी करणारा वैभव आज नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. पंचांशी वाद घालत असतानाचा त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.
वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्ध त्याच्याच शैलीत खेळत होता. डावात त्याला सलामीला पाठवण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्याने मैदानात येताच गोलंदाजांवर हल्ला केला आणि दोन चौकार आणि एक षटकार मारला. पण त्यानंतर, सातव्या षटकात तो बाद झाला. विकेटकीपर अलेक्स ली यंगने चार्ल्स लेचमंडच्या चेंडूवर त्याचा झेल घेतला. पंचांनी लगेच त्याला बाद घोषित केले. पण चेंडू त्याच्या बॅटऐवजी त्याच्या थाय पॅडवर लागला असल्याचा दावा वैभवने केला.
वैभवचा पंचांशी मैदानातच वाद
पंचांनी बाद ठरवल्यानंतरही वैभव सूर्यवंशी खेळपट्टीजवळ उभा राहिला. तो पंचांशी काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर तो पंचांशी वाद घालू लागला. पंचांनी बाद ठरवल्यानंतर तो चालत चालत पंचांच्या दिशेने आला. तो पंचांना आधी समजवताना दिसला. पण नंतर मात्र पंचांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे तो काहीसा संतापलेला दिसला. वैभव सूर्यवंशी भरमैदानात इतका रागावलेला दिसण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळेच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Web Title : विवाद: वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया में अंपायरों से भिड़े, मचा बवाल!
Web Summary : ऑस्ट्रेलिया में खेल रहे युवा भारतीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी विवादास्पद रूप से आउट दिए जाने के बाद अंपायरों से भिड़ गए। उन्होंने दावा किया कि गेंद बल्ले की बजाय पैड पर लगी थी, जिसके कारण गरमागरम बहस हुई और वीडियो वायरल हो गया।
Web Title : Vaibhav Suryavanshi's on-field argument with umpires sparks controversy in Australia.
Web Summary : Young Indian cricketer Vaibhav Suryavanshi, playing in Australia, argued with umpires after being controversially given out. He claimed the ball hit his pad, not the bat, leading to a heated exchange and a viral video.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.