विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना

दिग्गजांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना वैभव सूर्यवंशीसाठी चालून आली मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:23 IST2025-08-12T14:15:50+5:302025-08-12T14:23:12+5:30

whatsapp join usJoin us
Vaibhav Suryavanshi Undergoing Exclusive Training To Replace Retiring Seniors BCCI Is Looking Ahead Rohit Sharma And Virat Kohli | विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना

विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी याने वयाच्या १४ व्या वर्षी IPL मध्ये धमाकेदार पदार्पण करत "मूर्ती लहान पण कीर्ती महान" या म्हण सत्यात उरवली. आता या लहान मूर्तीला महान क्रिकेटरच्या रुपात घडवण्यासाठी बीसीसीआयने खास प्लॅन आखल्याचे समोर येत आहे. आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये हवा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीलाबीसीसीआयने बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत बोलवले आहे. इथं एन्ट्री करण्याआधी त्याने राजस्थान रॉयल्सच्या खास ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेतला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१४ वर्षांच्या पोराची BCCI च्या खास प्रोग्राममध्ये एन्ट्री 

Mykhel च्या वृत्तानुसार, वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा बीसीसीआयच्या स्पेशल प्रोग्रामचा एक भाग असणार आहे. या प्रोग्राम अंतर्गत युवा बॅटरला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच आंतरारष्ट्रीय स्तरावर कणखर मानसिकतेसह मैदानात उतरवण्यासाठी आवश्यक गोष्टींवर भर दिला जाईल.

क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात

दिग्गजांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना वैभव सूर्यवंशीला मोठी संधी

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडेतील भविष्याबद्दल चर्चा रंगत असताना तुफान फटकेबाजीसह क्रिकेटचं मैदान गाजवण्याची क्षमता असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला तयार करण्यासाठी बीसीसीआयने मोठं पाउल उचलल्याची गोष्ट समोर आलीये.  वैभव सूर्यवंशी याचे बालपणीचे कोच मनीष ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एका बाजूला वरिष्ठ खेळाडू निवृत्त होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांची जागा घेण्यासाठी युवा खेळाडूंना तयार करणे गरजेचे आहे. वैभव सूर्यवंशी बीसीसीआयच्या याच खास प्रोग्रामचा एक भाग आहे."

टी-२० अन् वनडेत धमक दिसली, पण...

वैभव सूर्यवंशी याची बंगळुरुमधील ट्रेनिंग ही आठवड्याभरासाठी असणार आहे. त्यानंतर तो १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या ताफ्यात सामील होईल. वैभव सूर्यवंशी याने टी-२० आणि वनडेत आपल्या भात्यातील धमक दाखवली आहे. पण कसोटीत स्थिरावण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागेल, खुद्द त्याचे कोच ओझा यांनीच ही गोष्ट बोलून दाखवली आहे.

Web Title: Vaibhav Suryavanshi Undergoing Exclusive Training To Replace Retiring Seniors BCCI Is Looking Ahead Rohit Sharma And Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.