Join us

पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, 'ही' आहे खासियत

Vaibhav Suryvanshi New bats speciality: अवघ्या १४ वर्षांच्या पोराला अशा पद्धतीचा बहुमान मिळणं ही मोठी गोष्ट आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:54 IST

Open in App

Vaibhav Suryvanshi New bats speciality: IPL 2025 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी. त्याने आपल्या फटकेबाज खेळीच्या जोरावर कमी वेळात भरपूर नाव कमावले. अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला भारताच्या अंडर-१९ संघातर्फे इंग्लंड दौऱ्याचीही संधी मिळाली. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. २७ जूनपासून या संघाची मालिका सुरू होणार आहे. त्यात वैभव सूर्यवंशीदेखील खेळताना दिसणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीपूर्वी वैभव सूर्यवंशीला ३ नवीन बॅट्स मिळाल्या आहेत. या बॅट्समध्ये एक वेगळीच खास बात आहे.

वैभव सूर्यवंशीच्या तीन नव्या बॅट्स

वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून असा अंदाज लावला जातो की, प्रत्येक बॅटची किंमत ही किमान एक ते दीड लाखांच्या घरात असेल, यात काही शंका नाही. याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण या बॅट्सचे एक खास वैशिष्ट्य आहे. वैभव सूर्यवंशीच्या तीनही नवीन बॅट एसएस कंपनीच्या आहेत, ज्याचा फोटो त्याने त्याच्या इंस्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे.वैभव सूर्यवंशीचा एसएस बॅटशी करार आयपीएल २०२५ दरम्यान झाला होता. इन्स्टा स्टोरीमध्ये दिसून येते की या बॅट त्याला जतीन सरीनने दिले आहेत. कारण, वैभवने त्याचे आभारही मानले आहेत. यासोबतच त्याने असेही लिहिले आहे की हे खूप छान गिफ्ट आहे.

बॅटवर लिहिलंय वैभवचं नाव

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या तीन बॅटची स्वतःची एक खासियत आहे. या तिन्ही बॅटवर वैभवचे नावदेखील लिहिलेले आहे. वैभव पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर खेळणार आहे. अशा वेळी तो नव्या बॅट काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, भारताच्या १९ वर्षांखालील संघाला २७ जून ते २३ जुलै या कालावधीत इंग्लंड दौऱ्यावर ५ एकदिवसीय सामने आणि २ बहुदिवसीय सामने खेळायचे आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वी १९ वर्षांखालील संघाला २४ जून रोजी पन्नास षटकांचा सराव सामना खेळायचा आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५इंग्लंडभारतीय क्रिकेट संघराजस्थान रॉयल्स