Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभव सूर्यवंशीचा नवा विश्वविक्रम; विराटलाही टाकलं मागं, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय!

Vaibhav Suryavanshi: आयसीसी अंडर-१९ विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. अवघ्या २० डावांत १००० धावांचा टप्पा पार करत त्याने चक्क किंग विराट कोहलीला मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:46 IST

Open in App

आयसीसी अंडर-१९ विश्वचषकात भारताचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने आपल्या बॅटने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या गट टप्प्यातील सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच रन मशीन विराट कोहलीला मागे टाकले आणि आपल्या युवा एकदिवसीय कारकिर्दीत १००० धावांचा टप्पा ओलांडला.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या २० डावांत ५० हून अधिक सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या कामगिरीसह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने २८ सामन्यांच्या २५ डावांत ४६.५७ च्या सरासरीने ९७८ धावा केल्या होत्या. वैभवने आता कोहलीला मागे टाकत युवा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ७ भारतीयांच्या यादीत स्थान मिळवले आहे. युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीयांच्या यादीत वैभव आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने अवघ्या १३ डावात हा पराक्रम केला. त्यानंतर उन्मुक्त चंद १७ डावासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

बुलावायोच्या मैदानावर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (६ धावा), वेदांत त्रिवेदी (०) आणि विहान मल्होत्रा (७ धावा) स्वस्तात बाद झाले. 'सुपर सिक्स'मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत वैभव सूर्यवंशीच्या या विक्रमी कामगिरीने भारतीय चाहत्यांना दिलासा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi sets world record, surpasses Kohli in U19 feat.

Web Summary : Vaibhav Suryavanshi broke Virat Kohli's record in U19 cricket, reaching 1000 runs in just 20 innings. He is now the third fastest Indian to achieve this milestone in youth ODIs. India aims to secure a spot in 'Super Six' after a poor start against Bangladesh.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीविराट कोहलीऑफ द फिल्डभारत विरुद्ध बांगलादेश