AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!

पहिल्या पाच ओव्हरमध्ये संघाच्या धावफलकावर लावल्या ५० धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:16 IST2025-09-21T17:14:19+5:302025-09-21T17:16:46+5:30

whatsapp join usJoin us
Vaibhav Suryavanshi Batting Against Australia Under 19 IND U 19 vs AUS U 19 | AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!

AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vaibhav Suryavanshi Batting Against Australia Under 19 : भारताचा १४ वर्षीय उद्योन्मुख क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आता ऑस्ट्रेलियातील धमाकेदार खेळीमुळे चर्चेत आला आहे. भारतीय अंडर १९ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षांखालील संघात वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वैभव सूर्यंवशीन धमाकेदार ट्रेलर दाखवून ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. 

१७२.७२ च्या स्ट्राईक रेटसह कुटल्या धावा


भारतीय गोलंदाजांनी या वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघाला  २२५ धावांत आटोपले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी याने आक्रमक अंदाजात फटकेबाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने त्याने २२ चेंडूत १७२.७२ च्या स्ट्राईक रेटसह ३८ धावांची खेळी केली. थोड सावध खेळत ही खेळी मोठी करण्याची त्याच्याकडे संधी होती. पण हेडन शिलरच्या गोलंदाजीवर तो भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन ताफ्यातील आर्यन शर्माकडे झेल देऊन माघारी फिरला.  

पहिल्या पाच ओव्हरमध्ये संघाच्या धावफलकावर लावल्या ५० धावा

वैभव सूर्यवंशीच्या रुपात पहिली विकेट गमावली त्यावेळी भारतीय संघाच्या धावफलकावर ५० धावा लागल्या होत्या. युवा सलामीवीराच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतीय संघाने प्रत्येक षटकात १० च्या सरासरीने धावा काढल्या. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर वैभव सूर्यवंशी माघारी फिरला. आगामी सामन्यात ही चूक टाळून त्याला मैदानात उतरावे लागेल.

याआधी इंग्लंड दौऱ्यात केली होती कमाल

आयपीएल २०२५ च्या स्पर्धेत ३५ चेंडूत शतक झळकावल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील अंडर १९ संघात त्याची वर्णी लागली. या दौऱ्यात त्याने हवा केली. आता ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी तो तयार आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने १ शतक १४३ (७८) आणि एका अर्धशतकासह ८६ (३१) विशेष छाप सोडली होती.  या दौऱ्यातील उर्वरित तीन सामन्यात त्याने ४८ (१९), ४५ (३४) आणि ३३ (४२) अशी धावसंख्या केली होती.  

या दोघांची नाबाद अर्धशतकी खेळी; भारतीय संघाने ३१ व्या षटकात जिंकली मॅच

ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३०.३ षटकात फक्त ३ विकेट्स गमावून सामना सहज जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अभिग्यन कुंडू याने नाबाद ८७ धावांची खेळी केली. याशिवाय वेदांत त्रिवेदन नाबाद ६१ धावाठोकल्या.
 

Web Title: Vaibhav Suryavanshi Batting Against Australia Under 19 IND U 19 vs AUS U 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.