Join us  

मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप; वासिम जाफरनं दिला राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश 

CM orders probe into Wasim Jaffer's resignation

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 2:25 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) हा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळेच जाफरनं उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिमवर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिमनं हे आरोप फेटाळून लावले आणि आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत ( Chief Minister Trivendra Singh Rawat ) यांनी सोमवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. IND vs ENG, R Ashwin: भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला, पण आर अश्विन मोठ्या पराक्रमाला मुकला!

वासिमनं केवळ मुस्लिम खेळाडूंनाच प्राधान्य दिले नाही, तर ड्रेसिंग रुममध्ये मौलवींनाही आणल्याचा आरोप केला गेला आहे. पण, वासिमवर होत असलेल्या आरोपांना माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे व मोहम्मद कैफ यांच्यासह अनेकांनी सडेतोड उत्तर दिले. क्रिकेटपटू वासिमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री रावत यांची भेट घेतली आणि त्यानंतर यांनी चौकशीचे आदेश दिले. ''ही नेहमीची बैठक होती आणि त्यावेळी जाफरचा मुद्दा निघाला. जर मला कोणतीही तक्रार मिळाली, तर या प्रकरणाची चौकशी नक्की केली जाईल,''असे रावत यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.   World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी माहिम वर्मा यांनी वासिमवर टीका केली. त्याला उत्तर देताना वासिम म्हणाला,'' माझ्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे प्रचंड दु:ख झाले आहे.संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे. इक्बाल अब्दुलाला संघाचे कर्णधार बनवायचे होते, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत.'' 

टॅग्स :वासिम जाफरउत्तरा कन्नड