Join us

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला संशयित दहशतवादी म्हणून अटक

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 09:30 IST

Open in App

सिडनीः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांच्या उस्मान ख्वाजाकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करेल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला. पण, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच ख्वाजाच्या अडचणी वाढल्या आहेत. ख्वाजाच्या भावाला दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अर्सलान ख्वाजाला ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अटक केली आहे. 39 वर्षीय अर्सलानला पश्चिम सिडनीतील पॅरामाट्टा येथून अटक करण्यात आली. यावर उस्मानने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,'' या प्रकरणावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत आणि पोलीस त्यांचे काम चोख करतील, असा मला विश्वास आहे. या काळात माझ्या आणि कुटुंबियांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, अशी मी विनंती करतो.'' 

न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीत मिळालेल्या एका पुस्तकात दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची नोंद करण्यात आली होती. या नोंदीत माजी परराष्ट्र मंत्री ज्युली बिशॉप, माजी पंतप्रधान मॅल्कोल्म टर्नबूल आणि अन्य महत्त्वांच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा उल्लेख होता. या प्रकरणी मोहमद निझामदीन यालाही अटक केली आहे.  

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया