Join us

USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण

T20 World Cup 2024, USA vs Canada : अमेरिका आणि कॅनडा यांच्यात विश्वचषकाचा सलामीचा सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 07:08 IST

Open in App

USA vs Canada Live Match Updates | डल्लास : ट्वेंटी-२० विश्वचषकाचा सलामीचा सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होत आहे. हा सामना म्हणजे आमच्यासाठी भारत आणि पाकिस्तान यापेक्षा मोठा असल्याचे अमेरिकेचा खेळाडू अली खान सांगतो. मूळचे भारत आणि पाकिस्तानचे असलेले शिलेदार आज मैदानात आहेत. खरे तर दोन्हीही संघांचे कर्णधार पाहिले तर हा सामना भारत विरूद्ध पाकिस्तान असाच काहीसा आहे. कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर हा मूळचा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील आहे, तर अमेरिकेचा कर्णधार मोनंक पटेल भारतातील गुजरात येथील आहे. 

दरम्यान, अमेरिकेच्या संघात न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू कोरी अँडरसनचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिला आहे. याशिवाय २०१२ मध्ये भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा असलेला हरमीत सिंग देखील अमेरिकेच्या संघात आहे. त्याने राजस्थान रॉयल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे. 

तसेच मूळचा पाकिस्तानातील असलेला अली खान अमेरिकेकडून खेळत आहे. तो शेजारील देशातील अटॉक येथील आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये अलीने कराची किंग्स आणि इस्लामाबाद युनायटेड, आणि आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अमेरिकेच्या संघात जगभरातील विविध देशांंमधील खेळाडू असल्याचे दिसते. 

अमेरिकेचा संघ -मोनंक पटेल (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिस गूस, अरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शादले वॅन शल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान. 

कॅनडाचा संघ -साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोवा, डिलप्रीट बाजवा, डिलन हेलिगर, निखिल दत्ता, कलीम साना, जेरेमी गॉर्डोन. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अमेरिकाकॅनडाभारत विरुद्ध पाकिस्तान