अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम आता सरदार वल्लभभाई स्टेडियम म्हणून ओळखलं जाणार असून त्याची प्रेक्षकक्षमता 1.10 लाख इतकी आहे. 2015साली 53000 प्रेक्षकक्षमता असलेलं मोटेरा स्टेडियम पाडून नवं स्टेडियम बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या स्टेडियमचं उद्धाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या स्टेडियमवर जागतिक एकादश आणि आशियाई एकादश असा ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात येणार होता. पण, स्टेडियमचं काम वेळेत पूर्ण होत नसल्यानं हा सामना हलवण्यात आला. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या दरम्यान ते या स्टेडियमचं उद्धाटन करतील. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांची भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की,''अहमदाबाद विमानतळ ते स्टेडियमपर्यंत 5 ते 7 लाख लोकं उपस्थित राहणार आहेत. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. ते जवळपास बांधून तयार आहे.''
या स्टेडियमच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमवर केवळ क्रिकेटचे सामने होणार नसून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, टेनिस, अॅथलेटिक्स ट्रॅकस स्क्वॉश, बिलियर्ड्स, बॅडमिंटन आणि स्विमींग आदी खेळही खेळले जातील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावरवॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसनं याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशा आशयाचं ट्विट व्हाइट हाऊसनं केलं आहे. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करत आहेत. तसेच भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे.