Join us

ऐसा लगा की मै सडक पे आ गया!

Unmukt Chand: ‘भाई, इससे जादा क्या होगा?..’ - २०१९ मध्ये एका मुलाखतीत आपली पडझड सांगताना तो म्हणाला, मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नव्हतो हे खरं, पण माझ्या पुढ्यात भरपूर जेवण होतं, चमच्याने ते पोटभर खाता आलं असतं. पण मला ‘वेगळं’ काही हवं होतं, त्यात हातातलं सारं केव्हा निसटलं कळलंच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:15 IST

Open in App

- अनन्या भारद्वाज(मुक्त पत्रकार)‘भाई, इससे जादा क्या होगा?..’ - २०१९ मध्ये एका मुलाखतीत आपली पडझड सांगताना तो म्हणाला, मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नव्हतो हे खरं, पण माझ्या पुढ्यात भरपूर जेवण होतं, चमच्याने ते पोटभर खाता आलं असतं. पण मला ‘वेगळं’ काही हवं होतं, त्यात हातातलं सारं केव्हा निसटलं कळलंच नाही!आणि निसटलं म्हणजे तरी किती? २०१२ साली तो भारतीय अण्डर १९ संघाचा कप्तान होता, ऑस्ट्रेलियात विश्वचषक जिंकून परतला तेव्हा तर तो ‘स्टार’ झालेला होता. उन्मुक्त चंद नाव त्याचं.

एक काळ असा होता की पूर्व दिल्लीत राहणारा हा तरुण, क्रिकेटमधली दावेदारी बळकट करत विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकणार असा ‘स्वॅग’ घेऊन फिरत होता. शाळा शिक्षक आई-वडिलांचा मुलगा. लहानपणापासून केवळ महत्त्वाकांक्षी नव्हता तर त्याच्या बॅटिंगमध्येही जोर होता. धडाका लावला त्याने धावांचा. अण्डर १९ च्या विजयानंतर तर त्याच्यासाठी आयपीएलने पायघड्या घातल्या. मुंबई आणि दिल्ली संघाकडून तो खेळला. पण हळूहळू काहीतरी बिनसलं. त्याचा खेळावरचा फोकस हरवला, सातत्य आणि सराव शिस्त कमी झाली. गाडं इतकं घसरलं की २०१७ येता येता त्याला रणजीची दारं बंद झाली. आयपीएलमध्ये तीन वर्षे त्याच्यावर बोली लागली नाही. दिल्ली संघानेही त्याचा विचार करणं बंद केलं. आणि मग २०२१ मध्ये त्यानं भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत, त्यानं देशाला अखेरचा सलाम ठोकला. तो अमेरिकेला निघून गेला. त्यानं अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलियन बिग बॅश स्पर्धेत त्यानं धावांचा पाऊस पाडला. अमेरिकेत एंजेलिस नाईट रायडर संघाकडूनही त्यानं दणक्यात खेळ केला. त्याचं करिअर मार्गी लागलं असं वाटत असतानाच त्याला पुन्हा एकदा नकार मिळाला. अमेरिका-कॅनडा दरम्यान होणाऱ्या ५ टी ट्वेण्टी सामन्यासाठी त्याची निवड झाली नाही. भविष्यात टी-२० विश्वचषकाची दारंही या निर्णयामुळे बंदच झाल्यात जमा आहे. मागे भारतीय क्रिकेट सोडताना तो म्हणाला होता, ऐसा लगा की मै सडक पे आ गया! आताही पुन्हा तोच प्रश्न, पुढे काय? एका गुणी मुलाची अशी हिट विकेट झाली..  

टॅग्स :उन्मुक्त चंदभारतीय क्रिकेट संघअमेरिका