Join us
Daily Top 2Weekly Top 5

Two Hat-tricks in 24 Hours: अवघ्या २४ तासांत दोन हॅट्रिक; दुबईच्या मैदानात घडला मोठा इतिहास!

Unique Record in Dubai: दुबईत खेळल्या गेलेल्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत क्रिकेट चाहत्यांना एक अनोखा थरार पाहायला मिळाला. २१ जानेवारीला अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत वेस्ट इंडीजच्या स्प्रिंगरने ही कामगिरी करून दाखवली. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:07 IST

Open in App

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका रोमांचक वळणावर संपली आहे. अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजनेअफगाणिस्तानवर मात करत विजय मिळवला असला, तरी पहिल्या दोन सामन्यांतील दमदार कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने ही मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शमर स्प्रिंगरने घेतलेल्या हॅट्रिकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ निर्धारित षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ १३६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज शमर स्प्रिंगर ठरला. त्याने अफगाण फलंदाजीची दाणादाण उडवत शानदार हॅट्रिक पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संघ धावगती राखण्यात अपयशी ठरला आणि दडपणाखाली आला.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले

या मालिकेतील सर्वात विशेष बाब म्हणजे अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन हॅट्रिकची नोंद झाली. २१ जानेवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान याने हॅट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या शमर स्प्रिंगरने दुसऱ्याच दिवशी या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. एकाच मालिकेत इतक्या कमी वेळात दोन हॅट्रिक होणे ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना आहे.

अफगाणिस्तानची मालिकेवर झडप

या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही अफगाणिस्तानने विजय मिळवत मालिका खिशात घातली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाने १५ धावांनी विजय मिळवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Hat-tricks in 24 Hours: Historic Cricket Feat in Dubai!

Web Summary : Afghanistan won the T20 series against West Indies despite losing the last match. Shamar Springer's hat-trick couldn't prevent Afghanistan's series victory. Unprecedented: two hat-tricks within 24 hours marked a historic moment in T20 cricket.
टॅग्स :ऑफ द फिल्डअफगाणिस्तानवेस्ट इंडिज