Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बेस्ट ऑफ luck' वैभव सूर्यवंशी! बॅट बाजूला ठेवून पेन हाती; कोणत्या शाळेत आहे परीक्षा केंद्र?

भारतीय क्रिकेट बोर्डाचा विश्वास सार्थ ठरवल्यावर युवा क्रिकेटर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमुळे चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:12 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Now On The Pitch Of Board Exams CBSE  : भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) क्रिकेटच्या मैदानातील धमाकेदार कामगिरीनंतर आता शाळेच्या परीक्षेमुळे चर्चेत आला आहे. अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत विक्रमी शतकी खेळीसह  भारताला विजेतेपद मिळवून देण्यात  महत्त्वाची भूमिका बजावल्यावर वैभव सूर्यवंशी आता दहावीच्या बोर्डाची परीक्षा देणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचा विश्वास सार्थ ठरवल्यावर युवा क्रिकेटर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेकजण या युवा क्रिकेटरला परीक्षसाठी शुभेच्छा देत आहेत. 

कोणत्या शाळेत आहे त्याचं परीक्षा केंद्र?

CBSE बोर्डाने त्याचे प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. तो समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर परिसरातील एका खासगी शाळेचा विद्यार्थी आहे. व्यस्त क्रिकेट वेळापत्रक आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांदरम्यान अभ्यासासाठी वेळ काढणे ही त्याच्यासाठी मोठी आव्हानात्मक बाब ठरणार आहे. त्याचे परीक्षा केंद्र पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्याला तिथेच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचे हॉल तिकीटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शाळेच्या प्राचार्यांची प्रतिक्रिया

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नील किशोर सिन्हा यांनी सांगितले की, "आमच्यासाठी सर्व परीक्षार्थी समान आहेत आणि वैभव सूर्यवंशीही त्याचप्रमाणे आहे. त्याला कोणतेही व्हीआयपी वागणूक दिली जाणार नाही. तो इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देईल." सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cricketer Vaibhav Suryavanshi takes board exams; location revealed!

Web Summary : After Under-19 World Cup success, cricketer Vaibhav Suryavanshi prepares for tenth-grade board exams. His exam center is Poddar International School. He'll receive no special treatment, says Principal Sinha.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीदहावीऑफ द फिल्ड