Join us

अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

आशिया चषक टी-२० २०२५च्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारून आशियात आमचा डंका असल्याचा प्रत्यय दिला.

By karan darda | Updated: September 30, 2025 09:29 IST

Open in App

करण दर्डाएडिटोरियल डायरेक्टर,लोकमत मीडिया ग्रुप

आशिया चषक टी-२० २०२५च्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारून आशियात आमचा डंका असल्याचा प्रत्यय दिला. अंतिम सामन्यासह पाकिस्तानचा तीनवेळा पराभव करताना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात युवा आणि अनुभवी खेळाडूंनी कामगिरीचा अमिट ठसा उमटविला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाकडून युवा अभिषेक शर्माने सर्वाधिक ३१४ धावा केल्या, तर अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने सर्वाधिक १७ बळी घेतले. तिलक वर्मा, संजू सॅमसन यांनीही ठोस योगदान दिले, गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी संमिश्र कामगिरी केली. कर्णधार सूर्या फलंदाजीत तळपला नसला तरी नेतृत्वाच्या कसोटीत तो अव्वल ठरला. लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटोरियल डायरेक्टर करण दर्डा यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे रिपोर्ड कार्ड तयार केले. त्यानुसार १० पैकी ७ च्यावर गुण मिळालेले ५ खेळाडू मेरिटमध्ये आले आहेत. आशिया चषकातील टीम इंडियाच्या कामगिरीचा हा आढावा....

'बीसीसीआय'कडून २१ कोटींचा पुरस्कार

आशिया चषक विजेत्या भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफला 'बीसीसीआय'ने २१ कोटींचा रोख पुरस्कार जाहीर केला. कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळेल, हे बोर्डाने स्पष्ट केले नाही. सचिव देवजीत सैकिया म्हणाले, 'पाकिस्तानला तीनवेळा पराभूत करून चषक विजेत्या भारतीय संघाची ही अतुलनीय कामगिरी आहे.'

तिलक वर्मासामने : ७धावा : २१३सरासरी : ७१.००अर्धशतक : १सर्वोत्कृष्ट : ६९*स्ट्राइक रेट : १३१.४८गुण : ८/१० 

अक्षर पटेलसामने : ७धावा : ५७सरासरी: ५७.००सर्वोत्कृष्ट : २६स्ट्राइक रेट: ५७  बळी : ६सर्वोत्कृष्ट : २/१८इकोनॉमी : ६.९०गुण : ७/१०

हार्दिक पांड्यासामने : ६धावा : ४८सरासरी : १६.००सर्वोत्कृष्ट : ३८अर्धशतक : ०स्ट्राइक रेट : १२०बळी : ४इकोनॉमी : ८.५७सर्वोत्कृष्ट १/७गुण : ५/१० शिवम दुबेसामने : ६धावा: ५०सरासरी : १६.६६सर्वोत्कृष्ट : ३३स्ट्राइक रेट: १२५बळी : ५ सर्वोत्कृष्ट : ३/४इकोनॉमी : ७.७६गुण : ८/१० 

जसप्रीत बुमराहसामने : ५धावा : १३५बळी : ७सरासरी: १९.२८सर्वोत्कृष्ट : २/१८इकोनॉमी : ७.४३गुण : ७/१० 

शुभमन गिलसामने : ७धावा : १२७सरासरी: २१.१६सर्वोत्कृष्ट : ४७अर्धशतक : ०स्ट्राइक रेट : १५१.१९गुण : ४/१०वरुण चक्रवर्तीसामने : ०६बळी : ०७सरासरी : २०.४२सर्वोत्कृष्ट : २/२९इकोनॉमी : ६.५०गुण : ७/१०संजू सॅमसनसामने : ७  धावा : १३२सरासरी : ३३.००सर्वोत्कृष्ट : ५६अर्धशतक : १स्ट्राइक रेट : १२४.५२गुण : ६/१०सूर्यकुमार यादवसामने : ७धावा : ७२अर्धशतक : ०सरासरी : १८सर्वोत्कृष्ट : ४७*स्ट्राइक रेट : १०१.४०गुण : ४/१०कुलदीप यादवसामने : ७बळी : १७सरासरी : ९.२९इकॉनॉमी : ६.२७सर्वोत्कृष्ट : ४/७गुण : ९/१०

अभिषेक शर्मासामने : ७धावा : ३१४सरासरी: ४४.८५अर्थशतके : ३सर्वोत्कृष्ट : ७५स्ट्राइक रेट : २००

कोणाला किती बक्षीस?

आशिया चषक विजेता : २.६ कोटीउपविजेता पाकिस्तान : ६६.५७ लाख रुपयेस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : अभिषेक शर्मा १३.३० लाख रुपयेअंतिम लढतीतील सामनावीर : तिलक वर्मा २.६६ लाख रुपयेस्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू : कुलदीप यादव १३.३० लाख रुपये

अभिषेकला मिळालेल्या कारची किंमत ३३ लाख ६० हजार : धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कारात सौदीतील हावल एम ९ एसयूव्ही ही आरामदायी कार मिळाली आहे. या कारची किंमत भारतीय रुपयांमध्ये ३३ लाख ६० हजार ६५८ रुपये इतकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Undefeated Asia Cup Triumph: Dominating Performance, Foiling Rivals

Web Summary : India clinched the Asia Cup, defeating Pakistan thrice. Abhishek Sharma's batting and Kuldeep Yadav's bowling starred. BCCI awarded the team ₹21 crores for their stellar performance. Tilak Verma and Shivam Dube also shone brightly in the tournament.
टॅग्स :एशिया कपभारतभारत विरुद्ध पाकिस्तान