करण दर्डा
एडिटोरियल डायरेक्टर,
लोकमत मीडिया ग्रुप
आशिया चषक टी-२० २०२५च्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारून आशियात आमचा डंका असल्याचा प्रत्यय दिला. अंतिम सामन्यासह पाकिस्तानचा तीनवेळा पराभव करताना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात युवा आणि अनुभवी खेळाडूंनी कामगिरीचा अमिट ठसा उमटविला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाकडून युवा अभिषेक शर्माने सर्वाधिक ३१४ धावा केल्या, तर अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने सर्वाधिक १७ बळी घेतले. तिलक वर्मा, संजू सॅमसन यांनीही ठोस योगदान दिले, गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी संमिश्र कामगिरी केली. कर्णधार सूर्या फलंदाजीत तळपला नसला तरी नेतृत्वाच्या कसोटीत तो अव्वल ठरला. लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटोरियल डायरेक्टर करण दर्डा यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे रिपोर्ड कार्ड तयार केले. त्यानुसार १० पैकी ७ च्यावर गुण मिळालेले ५ खेळाडू मेरिटमध्ये आले आहेत. आशिया चषकातील टीम इंडियाच्या कामगिरीचा हा आढावा....
'बीसीसीआय'कडून २१ कोटींचा पुरस्कार
आशिया चषक विजेत्या भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफला 'बीसीसीआय'ने २१ कोटींचा रोख पुरस्कार जाहीर केला. कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळेल, हे बोर्डाने स्पष्ट केले नाही. सचिव देवजीत सैकिया म्हणाले, 'पाकिस्तानला तीनवेळा पराभूत करून चषक विजेत्या भारतीय संघाची ही अतुलनीय कामगिरी आहे.'
तिलक वर्मा
सामने : ७
धावा : २१३
सरासरी : ७१.००
अर्धशतक : १
सर्वोत्कृष्ट : ६९*
स्ट्राइक रेट : १३१.४८
गुण : ८/१०
अक्षर पटेल
सामने : ७
धावा : ५७
सरासरी: ५७.००
सर्वोत्कृष्ट : २६
स्ट्राइक रेट: ५७
बळी : ६
सर्वोत्कृष्ट : २/१८
इकोनॉमी : ६.९०
गुण : ७/१०
हार्दिक पांड्या
सामने : ६
धावा : ४८
सरासरी : १६.००
सर्वोत्कृष्ट : ३८
अर्धशतक : ०
स्ट्राइक रेट : १२०
बळी : ४
इकोनॉमी : ८.५७
सर्वोत्कृष्ट १/७
गुण : ५/१०
शिवम दुबे
सामने : ६
धावा: ५०
सरासरी : १६.६६
सर्वोत्कृष्ट : ३३
स्ट्राइक रेट: १२५
बळी : ५
सर्वोत्कृष्ट : ३/४
इकोनॉमी : ७.७६
गुण : ८/१०
जसप्रीत बुमराह
सामने : ५
धावा : १३५
बळी : ७
सरासरी: १९.२८
सर्वोत्कृष्ट : २/१८
इकोनॉमी : ७.४३
गुण : ७/१०
शुभमन गिल
सामने : ७
धावा : १२७
सरासरी: २१.१६
सर्वोत्कृष्ट : ४७
अर्धशतक : ०
स्ट्राइक रेट : १५१.१९
गुण : ४/१०
वरुण चक्रवर्ती
सामने : ०६
बळी : ०७
सरासरी : २०.४२
सर्वोत्कृष्ट : २/२९
इकोनॉमी : ६.५०
गुण : ७/१०
संजू सॅमसन
सामने : ७
धावा : १३२
सरासरी : ३३.००
सर्वोत्कृष्ट : ५६
अर्धशतक : १
स्ट्राइक रेट : १२४.५२
गुण : ६/१०
सूर्यकुमार यादव
सामने : ७
धावा : ७२
अर्धशतक : ०
सरासरी : १८
सर्वोत्कृष्ट : ४७*
स्ट्राइक रेट : १०१.४०
गुण : ४/१०
कुलदीप यादव
सामने : ७
बळी : १७
सरासरी : ९.२९
इकॉनॉमी : ६.२७
सर्वोत्कृष्ट : ४/७
गुण : ९/१०
अभिषेक शर्मा
सामने : ७
धावा : ३१४
सरासरी: ४४.८५
अर्थशतके : ३
सर्वोत्कृष्ट : ७५
स्ट्राइक रेट : २००
कोणाला किती बक्षीस?
आशिया चषक विजेता : २.६ कोटी
उपविजेता पाकिस्तान : ६६.५७ लाख रुपये
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : अभिषेक शर्मा १३.३० लाख रुपये
अंतिम लढतीतील सामनावीर : तिलक वर्मा २.६६ लाख रुपये
स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू : कुलदीप यादव १३.३० लाख रुपये
अभिषेकला मिळालेल्या कारची किंमत ३३ लाख ६० हजार : धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कारात सौदीतील हावल एम ९ एसयूव्ही ही आरामदायी कार मिळाली आहे. या कारची किंमत भारतीय रुपयांमध्ये ३३ लाख ६० हजार ६५८ रुपये इतकी आहे.