Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : विजयासाठी हव्या होत्या १ चेंडूत ५ धावा; षटकार नाही, नो बॉलही नाही तरीही जिंकला सामना, जे घडलं ते अविश्वसनीय होतं... 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे उगाच कोणी म्हणत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 09:51 IST

Open in App

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे उगाच कोणी म्हणत नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये दोन दिवसांपूर्वी २ चेंडूंत ७ धावा हव्या असताना फलंदाजांनी मारलेला उत्तुंग फटका सीमापार जाईल असेच वाटले होते, परंतु टीम डेव्हिडनं सीमारेषेवर भन्नाट झेल घेत संघाला जिंकून दिले. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत जे घडलं त्यावर विश्वास ठेवणे अवघड जात आहे. AM संघाला विजयासाठी अखेरच्या चेंडूंवर ५ धावांची गरज होती. प्रतिस्पर्धी गोलंदाजानं सुरेख चेंडू टाकला अन् AMच्या फलंदाजाला षटकार खेचता आला नाही. तरीही त्यांनी पाच धावा पळून काढल्या आणि अविश्वसनीय विजय मिळवला...

हा सामना भारतातलाच असावा कारण समालोचन हिंदीत सुरू होते. AM संघानं १९.५ षटकांत ८ बाद १५० धावा केल्या होत्या आणि त्यांना अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावा करायच्या होत्या. रहील माजे नावाचा फलंदाज स्ट्राईकवर होता अन् त्याला नॉन स्ट्राईकवर अदील अबीद शाम साथ देत होता. तो अखेरचा चेंडू रहीलनं मिड ऑनच्या दिशेनं मारला आणि दोन्ही खेळाडू धाव घेण्यासाठी पळत सुटले. सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक चेंडू हातात घेऊन स्टम्पच्या दिशेनं पळत सुटला अन् नॉन स्ट्रायकर एंडच्या बेल्स त्याने पाडल्या. पण, फलंदाज क्रीजवरच होता. 

त्यानंतर नेमकं  काय घडलं अन् हा सामना कसा जिंकला ते पाहा...

टॅग्स :टी-20 क्रिकेटसोशल व्हायरल
Open in App