Join us

Shai Hope Bizarre Hit Wicket : वाइड बॉलवर फलंदाजाची फजिती! स्टंपवर बॅट मारुन फेकली विकेट

यात तो फसला अन् त्याला आपल्या विकेटच्या रुपात किंमत मोजावी लागली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:04 IST

Open in App

Shai Hope Bizarre Hit Wicket On Wide Ball : कॅरेबियन ट्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यातील कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ (CPL 2025) स्पर्धेतील १७ व्या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार बॅटर विचित्र पद्धतीने बाद झाला. वाइड चेंडूवर स्टाईल मारण्याच्या नादात शाई होप याच्यावर हिट विकेट (Hit wicket) होऊन तंबूत परतण्याची नामुष्की ओढावली. टेरेंस हिंड्स याच्या गोलंदाजीवर गयानाच्या डावातील १४ व्या षटकात होपनं स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला.  यात तो फसला अन् त्याला आपल्या विकेटच्या रुपात किंमत मोजावी लागली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वाइड बॉलवर स्टाईल मारण्याच्या नादात फजिती

ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू  होप थर्ड मॅनच्या दिशेने मारायला गेला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी तो वाइडही दिला. पण या चेंडूवर शाई होप स्टाईल मारायला गेला अन्  स्टंपला बॅट लागून विकेट गमावल्यामुळे त्याची चांगलीच फजिती झाली. आतापर्यंत कदाचित कधीच तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या खेळाडूनं विकेट फेकल्याचे पाहिले नसेल. शाई होपनं या सामन्यात २९ चेंडूत  ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. 

प्रीटोरियस-सॅम्पसन यांची दमदार भागीदारी

होपच्या रुपात गयाना संघाने  १४ व्या षटकात  १०९ धावांवर ७ वी विकेट गमावली. त्यानंतर संघ अडचणीत असताना ड्वेन प्रीटोरियस (१६ चेंडूत २१ धावा) आणि क्वेंटिन सॅम्पसन (१९ चेंडूत  २५ धावा) करत आठव्या विकेटसाठी ३३ चंडूत ४८ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १६३ धावा लावल्या. 

शाहरुखच्या मालकीच्या संघानं मारली बाजी

या धावांचा पाठलाग करताना शाहरुख खानच्या सह मालकीच्या ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून एलेक्स हेल्स आणि कॉलिन मुन्रो या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६३ चेंडूत ११६ धावांची दमदार भागीदारी करत मॅच एकतर्फी केली. हेल्सनं ४३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७४ धावा तर मुन्रोनं ३० चेंडूत ५२ धावांची खेळी केली. केरॉन पोलार्ड  (१४ चेंडूत १२ धावा) आणि आंद्रे रसेल (१४ चेंडूत २७ धावा) करत १७.२ षटकातच संघाला विजय मिळवून दिला. 

टॅग्स :टी-20 क्रिकेट