Join us

भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज यंदाच्या IPL हंगामातून 'आउट'; त्याच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी

जलदगती गोलंदाजीची उणीव भरून काढण्यासाठी केकेआरनं खेळला मध्यम जलदगती गोलंदाजावर डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:23 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामाआधी गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फ्रँचायझी संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा  रेकॉर्ड नावे असलेला आणि  भारताचा सर्वात  जलदगती गोलंदाज असा टॅग लागलेला मोहरा यंदाच्या हंगामात मैदानात उतरणार नाही. दुखापतीमुळे त्याच्यावर  स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे ' जम्मू एक्सप्रेस' नावाने ओळखला जाणारा उमरान मलिक.  कोलकाताच्या संघानं त्याच्या जागी मध्यम जलदगती गोलंदाजाला बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील करून घेतले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तिसरा अन् भारताचा पहिला गोलंदाज

उमरान मालिक हा दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळणार नाही, अशी माहिती आयपीएलच्या अधिकृत वेब साइटवरून देण्यात आलीये. सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना त्याने १५७ kmph वेगाने चेंडू टाकत खास रेकॉर्ड सेट केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता. सर्वात वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असणारा भारतीय गोलंदाज हा टॅगही त्याला लागला.  त्यानंतर त्याची टीम इंडियातही एन्ट्री झाली. १० वनडे आणि ८ टी-२० सामन्यात त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याच्या नावे अनुक्रमे १३ आणि ११ विकेट्स जमा आहेत.

दुखापत अन् कामगिरीतील सातत्याचा अभावामुळे टीम इंडियातून आउट, आता...

दुखापत आणि कामगिरीतील सातत्याच्या  अभावामुळे तो टीम इंडियातील आपलं स्थान टिकवू शकला नाही. आयपीएलमध्ये पुन्हा आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्याची संधी त्याच्याकडे होती. पण आता तो या स्पर्धेलाच मुकणार असल्यामुळे टीम इंडियातील परतीसाठी त्याच्यासमोर मोठे आव्हानच निर्माण झाल्याचे दिसते. 

आता त्याच्या जागी मध्यम जलदगती गोलंदाज चेतन सकारियाला मिळाली संधी

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघानं उमरान मलिकला रिलीज केले होते. त्यानंतर मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं ७५ लाख रूपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आता तो स्पर्धेबाहेर पडल्यावर तेवढ्याच किंमतीसह त्यांनी दुखापतीतून सावरणारा मध्यम जलदगती गोलंदाज चेतन सकारियावर डाव लावला आहे. सकारियानं टीम इंडियाकडून १ वनडे आणि २ टी २० सह आयपीएलमध्ये १९ सामने खेळले आहेत. ही रिप्लेसमेंट केकेआरसाठी कितपत फायद्याची ठरणार ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२४भारतीय क्रिकेट संघ